Crime News : गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तडीपार गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुंडासह त्याच्या आईविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तडीपार गुंड जुबेर ऊर्फ वडी मुश्ताक शेख (वय 20), अमिरा शेख (दोघे रा. लोहियानगर, महात्मा फुले पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई सागर कुडले यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जुबेर शेखविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपार केल्यानंतर तो आदेश भंग करून शहरात वावरत होता. खडक पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई सागर कुडले आणि सहकारी लोहियानगर भागात गस्त घालत होते.
त्या वेळी पोलिसांच्या पथकाने जुबेर घरात असल्याचे पाहिले.

पोलिसांचे पथकाने घरात धाव घेतली. तेव्हा जुबेरची आई अमिरा दरवाजात थांबली. तिने पोलिसांची वाट अडवून धरली. जुबेर आणि अमिराने पोलिसांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. अमिराने जुबेरला घरातून पळून जाण्यास मदत केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी जुबेरसह त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक काळे तपास करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news