Crime News: बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्यास अटक

Crime News: बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्यास अटक

लोणावळा : बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एकास अटक केली आहे. तसेच, त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड असा एकूण 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्तकेला आहे.अविनाश ऊर्फ अवि कैलास आंबेकर (वय 26, रा. देवले, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल व अपर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी लोणावळा विभागीय सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना शस्त्र बाळगणार्‍यांवर कारवाई करण्याकरिता पथक नेमले आहेत.

35 हजार 500 रुपयांचामुद्देमाल जप्त

मंगळवारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना वरसोली येथील कचरा डेपोचे परिसरात एक व्यक्ती विनापरवाना पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारुन अविनाश आंबेकर याला अटक केली. तसेच, त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड असा 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, लोणावळा उपविभागीय सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या अधिपत्याखाली पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, हवालदार विजयकुमार मुंढे, नितीन कदम, संतोष शेळके, पोलिस नाईक गणेश होळकर, भूषण कदम, किशोर पवार, पोलिस अंमलदार संजयदादा पंडीत, सिद्धेश्वर शिंदे, ऋषीकेश पंचरास यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news