Crime News : मोक्कातील फरार आरोपीला बेड्या

Crime News : मोक्कातील फरार आरोपीला बेड्या
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गोळीबार व मोक्काच्या गुन्ह्यात दहा महिन्यांपासून फरार असलेल्या सराइताला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अक्षय नागनाथ कांबळे (वय 27, रा. ससाणेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोक्कातील फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या सूचनेनुसार पथकातील कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते.

पोलिस हवालदार सर्फराज देशमुख यांना मोक्कातील फरार आरोपी अक्षय कांबळे याच्याविषयी माहिती मिळाली. तो हडपसर येथील ससाणेनगर परिसरातील रामटेकडी इंडस्ट्रियल परिसरातील रेल्वे अंडरपास येथे थांबला असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे निरीक्षक राजेंद्र करणकोट, उपनिरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस हवालदार देशमुख, हरिदास कदम, महेश गाढवे, यतिन भोसले, गोपाल मदने, विष्णू सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news