पिंपरी: कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

पिंपरी: कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
Published on
Updated on

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोव्हिशिल्ड लसची टंचाई जाणवत होती. या लस आता उपलब्ध झाल्या आहेत. महापालिकेच्या 8 केंद्रांवर प्रत्येकी 500 या प्रमाणे बुधवारी (दि. 18) कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. कोव्हॅक्सिन लसचा साठा मात्र अत्यल्प असून प्रत्येक केंद्रांवर फक्त दहा लस देण्यात येणार आहे.

कोव्हिशिल्ड लस ही 18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस या पद्धतीने दिली जाणार आहे. तर, कोव्हॅक्सिन लस ही 14 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना पहिला, दुसरा व 18 वर्षावरील लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. कार्बेव्हॅक्स लसीचा मात्र सध्या तुटवडा आहे. 12 ते 14 वयोगटांतील मुलांना या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येतो; मात्र सध्या ही लस उपलब्ध नसल्याने मुलांचे लसीकरण ठप्प झाले आहे.

महापालिकेच्या 8 केंद्रांवर सकाळी 9.30 ते सायंकाळी 4.30 या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. गरोदर माता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय आदींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस, कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा दुसरा आणि प्रिकॉशन डोस बाकी आहे त्यांना कोविन अ‍ॅपद्वारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग करण्याची गरज नाही. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर त्यांचे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news