पुणे : कोरोना सक्रिय रुग्णांनी हजारी ओलांडली

पुणे : कोरोना सक्रिय रुग्णांनी हजारी ओलांडली

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बदललेले हवामान, विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आठ दिवसांत राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. सध्या 1308 सक्रिय रुग्ण असून, सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.
रविवारी राज्यात 236 नवीन रुग्णांचे निदान झाले.

आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांमधील कोरोनाबाधितांचा आकडाही हळूहळू वाढताना दिसत आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण 41 रुग्णांपैकी 9 रुग्ण पुणे, 8 रुग्ण मुंबई, तर प्रत्येकी एक रुग्ण नवी मुंबई, अमरावती, सांगली, औरंगाबाद, सातारा येथील आहेत. इतर रुग्ण बाहेरच्या राज्यांमधील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दैनंदिन अहवाला नुसार, एकूण सक्रिय 1308 रुग्णांपैकी 381 पुणे जिल्ह्यात, 279 मुंबई आणि 228 ठाणे जिल्ह्यातील आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news