

पुणे: राज्याच्या सहकार चळवळीमध्ये उत्कृष्ट योगदान दिलेल्या राज्यातील सहकारी संस्थांना सन 2023-24 या आर्थिक वर्षामधील कामगिरीच्या आधारावर शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी सहकारी संस्थांना यापूर्वी 18 जुलैपर्यंत असलेली मुदत वाढवून आता 31 जुलै करण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. एकूण 45 पुरस्कार देण्यात येणार आहेत. (Latest Pune News)
देशातील सहकारी चळवळीच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण राहिलेले आहे. सहकार चळवळीमुळे राज्यातील आर्थिक व सामाजिक विकासावर सकारात्मक परिणाम झालेला आहे. सहकार क्षेत्रात काम करणारे लोकप्रतिनिधी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सभासद, अधिकारी व कर्मचार्यांच्या मोलाच्या सहभागामुळे सहकारी संस्थांनी आपापल्या क्षेत्रात यश संपादन केले आहे.
सहकारी चळवळीच्या विकासात महत्वाचे योगदान दिलेल्या व सध्याही उत्कृष्ट कामकाज करीत असलेल्या सहकारी संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल ’सहकार पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकारी संस्थांनी तालुका, वॉर्ड स्तरावरील उप, सहाय्यक निबंधक कार्यालयात सहकार पुरस्कारासाठीचे प्रस्ताव अधिकाधिक प्रमाणात दाखल करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सर्व सहकारी संस्थांच्या पुरस्कारासाठीचे निकष व गुणांचा तपशिल याची सविस्तर माहिती सहकार आयुक्त कार्यालयाच्या https://sahakarayukta. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सर्व जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहाय्यक निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे. सहकारी संस्थांना देण्यात येणार्या सहकार पुरस्कारांचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे.