Cooperation Week: केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सहकार सप्ताह; सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे यांची माहिती

राज्यात दिनांक २९ जून ते ६ जुलै २०२६ दरम्यान आयोजन
Cooperation Week
Cooperation WeekPudhari
Published on
Updated on

पुणे: केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक औचित्यावर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशभरात दिनांक २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत 'सहकार सप्ताह' साजरा करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात हा सप्ताह अत्यंत व्यापक स्तरावर आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी सहकार आयुक्तालय व राज्यातील प्रमुख सहकारी महासंघांनी जय्यत तयारी केली असल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Cooperation Week
Cooperative Sector: सहकार व बँकिंग क्षेत्राच्या विकासासाठीच्या सूचनांचे स्वागत

यावेळी राज्य सहकारी बँकेंचे प्रशासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंटस महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहकारचे अपर निबंधक राजेंद्रकुमार दराडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे दिपक पटवर्धन, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, मानद सचिव ॲड सुभाष मोहिते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित होते.

सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत राज्यातील सहकारी संस्थांसाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना व उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना तावरे म्हणाले, सहकार चळवळीबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करणे.

Cooperation Week
Rahul Ankam Indian Navy: देशसेवेच्या स्वप्नाला मिळाले यशाचे पंख! पद्मशाली समाजातील राहुल अंकमची सब लेफ्टनंटपदाला गवसणी

युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्राशी जोडणे. सहकारी संस्थांच्या यशोगाथा समाजासमोर आणणे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे. सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभाग वृद्धिंगत करणे.

सहकार क्षेत्रातील नवकल्पना, तंत्रज्ञान व पारदर्शक व्यवस्थापनाचा प्रसार करणे ही सहकार सप्ताह आयोजन करण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.महाराष्ट्राची सहकार चळवळ ही देशात अग्रगण्य असून, या सप्ताहाच्या माध्यमातून तळागाळातील सभासदांपर्यंत सहकाराची भावना अधिक घट्ट करण्याचा विभागाचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

सहकार सप्ताह आणि केंद्रिय सहकार मंत्रालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची रुपरेषा.

राज्यस्तरीय कार्यशाळा व ध्वजारोहण: सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात येईल, ज्यामध्ये सहकाराची तत्त्वे व मूल्यांवर व्याख्याने होतील. तसेच, सप्ताहाच्या पहिल्या दिवशी (29 जून 2026) सर्व सहकारी संस्थांच्या इमारतींवर सहकार ध्वजाचे ध्वजारोहण केले जाईल आणि सहकाराची शपथ घेतली जाईल.

युवक व महिलांचा सहभाग आणि स्पर्धा: नवीन पिढीला सहकाराची ओळख करून देण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व व एकांकिका स्पर्धा घेतल्या जातील. तसेच कार्यक्रमांमध्ये महिला व युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढवला जाईल.

पर्यावरण व सामाजिक बांधिलकी: 'सहकार से समृद्धी' अंतर्गत संपूर्ण राज्यात संस्थांमार्फत व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल. यासोबतच रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाईल.

यशोगाथा व डिजिटल मोहीम: सहकारी संस्थांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचे छोटे व्हिडिओ व रील्स तयार करून ते समाज माध्यमांवर प्रसारित केले जातील.

गृहनिर्माण संस्थांसाठी तंटामुक्ती: राज्यातील गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये या सप्ताहात 'तंटामुक्ती अभियान' राबवून आपसातील वाद मिटवण्यावर भर दिला जाईल.

विशेषांक: विविध सहकारी संस्थांच्या फेडरेशनमार्फत सहकार सप्ताहाच्या निमित्ताने मासिकाचा विशेषांक छापण्यात येऊन त्यास व्यापकरित्या प्रसारीत करण्यात येईल.

नाविन्यपूर्ण उपक्रम: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत सहकाराच्या इतिहासावर हिंदीत लघुपट व 'सहकार प्रार्थना' तयार केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या वह्यांच्या पहिल्या पानावर सहकाराची माहिती छापण्याचाही मानस आहे. तसेच, सप्ताहादरम्यान 'राज्यस्तरीय युवा सहकारी संस्थेची' नोंदणी केली जाईल.

केंद्रीय योजनांचा प्रचार व समन्वय: या सप्ताहामध्ये आयोजित सर्व कार्यक्रमांच्या मुख्य व्यासपीठावर केंद्रीय सहकार मंत्रालयाचा लोगो बंधनकारक करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांपर्यंत प्रसार करण्यासाठी विशेष मेळावे घेतले जातील. असेच कार्यक्रम राज्यातील विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर, ग्रामपातळीवर देखील आयोजित करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news