Cooperative Sector: सहकार व बँकिंग क्षेत्राच्या विकासासाठीच्या सूचनांचे स्वागत

सहकार सप्तानिमित्त सहकाराचा उगम ते सद्यस्थितीवर माहितीपट करणार; राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती
Cooperative Sector
Cooperative SectorPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील जनतेच्या मनातील सहकार क्षेत्राबाबतच्या सूचनांचे सहकार व बँकिंग क्षेत्रात स्वागतच असून सहकार सप्ताहाच्या निमित्ताने या क्षेत्राच्या वाटचालीचा नवा पायाच त्याद्वारे तयार करण्यास आम्ही प्राधान्य दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

सहकार क्षेत्राशी संबंधित सहकाराचा उगम, मुहूर्तमेंढ ते सद्यस्थितीवर आधारित माहितीपट करण्यावर आम्ही काम करण्यास प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले.केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या सहकार मंत्रालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सहकार सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.

Cooperative Sector
Rahul Ankam Indian Navy: देशसेवेच्या स्वप्नाला मिळाले यशाचे पंख! पद्मशाली समाजातील राहुल अंकमची सब लेफ्टनंटपदाला गवसणी

महाराष्ट्र राज्यातील सहकारी बँका, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, कृषी संस्था, प्रक्रिया संस्था, ग्राहक संस्था, महिला व युवक सहकारी संस्था तसेच सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील सहकारी संघटनांनी एकत्रित येऊ इतिहासात प्रथमच असा उपक्रम सहकार सप्ताहाच्या निमित्ताने हाती घेतल्याचे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

सहकार क्षेत्राची स्वतःची प्रार्थना ही मराठी आणि हिंदीमध्ये असावी. राज्य सहकारी बँकेंच्या मुंबई येथील मुख्यालयात सहकार ज्ञानावर आधारित माहितीची गॅलरी करण्यास आमचे प्राधान्य राहील.

ज्यामध्ये हौसिंग सोसायटी, साखर कारखाने, सूत गिरण्यांसह अन्य क्षेत्राचा समावेश राहील. सहकार क्षेत्राशी धोरणे व योग्य सूचनांवर निश्चितपणे विचार करुन आगामी सहकारातील महत्वाच्या बदलावर विचारमंथन करण्याचा आमचा मानस असल्याचेही अनास्कर म्हणाले.

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनेच अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी पतसंस्थांमार्फत 25 हजार वृक्षारोपण, त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त करीत सप्ताहात एक लाख नवतरुण युवकांना पतसंस्था चळवळीशी जोडण्यासाठी प्रचार-प्रसिध्दीवर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.

Cooperative Sector
Katraj Water Tanker Center: दक्षिण पुण्याच्या पाणी प्रश्नाला मिळणार दिलासा'; कात्रज येथे टँकर भरणा केंद्राला मान्‍यता

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे मानद सचिव ॲड सुभाष मोहिते म्हणाले, 29 जूनला सहकार सप्ताहाची सुरुवात होऊन सर्व बँकांमध्ये सकाळी ११ वाजता एकाचवेळी सहकार ध्वजाचे अनावरण होईल. सहकार गीत वाजविले जाईल. ग्राहकांना सहकाराचे महत्व कळण्यासाठी फलक लावण्याबरोबरच एक कोटी संदेशही पाठविण्यात येतील. तसेच सात दिवस सहकार व्याख्यानमाला ऑनलाईन होणार आहे.

बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे यांनी शासनाने सुचविलेल्या जागेवर आम्ही वृक्षारोपण करुन त्याचे व्यवस्थापन करु. सोसायट्यांमध्ये सोलर सिस्टिवर ठोस कार्यक्रम हाती घ्यायला हवा.

राज्य सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार दराडे म्हणाले, संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत 4 जुलै रोजी सहकार परिषदेत पुरस्कार देण्याचे नियोजन आहे. दिनांक 1 जुलै रोजी शेतकरी गौरव दिन व 6 जुलै रोजी वृक्षदिन साजरा करण्यात येईल.

पुणे जिल्हा बँकेत सहकार सप्ताहानिमित्त आम्ही सहकार व बँकिंग क्षेत्रासाठी शारदा ग्रंथालय सुरु करण्याचा आमचा मानस आहे. राज्यातील जिल्हा बँकांसमोरील आव्हानांवर आधारित काल, आज आणि उद्या यावर परिसंवाद आयोजित करणार आहोत. गांवच्या विकास सोसायट्यांच्या विकासाचा रोडमॅप बनविण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे. सहकाराचे महत्व ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्राहक मेळावे आणि वृक्षारोपण करणार आहोत.

- प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे , अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news