Rahul Ankam Indian Navy: देशसेवेच्या स्वप्नाला मिळाले यशाचे पंख! पद्मशाली समाजातील राहुल अंकमची सब लेफ्टनंटपदाला गवसणी

बिबवेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा
Rahul Ankam Indian Navy
Rahul Ankam Indian NavyPudhari
Published on
Updated on

बिबवेवाडी: देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पद्मशाली समाजातील राहुल तुळशीदास अंकम यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. यामुळे बिबवेवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशाबद्दल राहुलचे बिबवेवाडी येथे पद्मशाली समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तुळशीदास अंकम आणि लक्ष्मी अंकम यांनी आपल्या मुलाने देशसेवा करावी, कुटुंब व समाजाचे नाव उज्ज्वल करावे, हे पाहिले होते. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राहुल याने हे स्वप्न साकार केले आहे.

Rahul Ankam Indian Navy
Katraj Water Tanker Center: दक्षिण पुण्याच्या पाणी प्रश्नाला मिळणार दिलासा'; कात्रज येथे टँकर भरणा केंद्राला मान्‍यता

खडकवासला येथे एनडीएचे चार वर्षांचे खडतर प्रशिक्षण त्याने नुकतेच पूर्ण केले असून, त्याची आता नौदलात सब लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. याबद्दल त्याचे बिबवेवाडी परिसरातून कौतुक होत आहे.

कठीण परिस्थितीवर मात करीत त्याने नौदलातील उच्च पदाला गवसणी घातली आहे. याबाबत बिबवेवाडी येथे पद्मशाली समाजाच्या वतीने राहुलचा सत्कार करण्यात आला.

'पद्मशाली संघम'चे सचिव गणेश शेरला यांनी राहुल याचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. राष्ट्रसेवेतील त्यांची कारकीर्द गौरवशाली ठरो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Rahul Ankam Indian Navy
Ghorpadi Railway Overbridge: घोरपडीतील उड्डाणपूल लवकरच होणार खुला; काम अंतिम टप्प्यात

या वेळी महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे, गणेश शेरला, महेश चलमल, बद्रिनाथ जन्नू, तुळशीदास अंकम, अशोक दुडम, अश्विनीकुमार चिनी, लक्ष्मण संगा, गोवर्धन करली, नरसिंग राजकोंडा, संदीप दोमा, बाबूराव इकलदेवी, रितांशू संगम आदींसह नागरिक उपस्थित होते.

आई-वडिलांचे संस्कार, त्याग, देशभक्तीची भावना आणि कठोर परिश्रम यामुळेच मला हे यश मिळाले. त्याचबरोबर गुरुजनांचे मार्गदर्शन आणि आशीर्वादही मोलाचे ठरले. लहानपणापासून पाहिलेले देशसेवेचे स्वप्न आज पूर्ण होत असून, याचा मला अभिमान आहे. यापुढे देशाची प्रामाणिकपणे सेवा करणार असून, समाजातील इतर युवकांनाही संरक्षण दलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे.

-राहुल अंकम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news