Devendra Fadnavis: महायुतीत पणन विभागाशी संबंधित बदल्यावरुन धुसफूस; फडणवीसांनी घेतली तक्रारींची दखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या तक्रारींची दखल
Devendra Fadnavis
Devendra FadnavisPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्याच्या सहकार विभागाच्या अपर निबंधकांच्या पणन विभागात प्रतिनियुक्तीने होणाऱ्या बदल्यांमध्ये पणन विभागाला विश्वासातच घेतले गेले नसल्याच्या तक्रारीवरुन महायुतीत सहकार व पणन विभागात धुसफूस झाल्याचे चित्र शुक्रवारी (दि.22) समोर आले आहे.

त्यामुळे गुरुवारी सहकार विभागाने केलेल्या आठ अपर निबंधकांच्या पदोन्नत्यांमध्ये पणन विभागाशी संबंधित चार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तुर्तास थांबविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांकडून समजली.

Devendra Fadnavis
PMPML bus accident Pune: कचरावेचकांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर; मोहन जगधने यांच्या कुटुंबीयांना 10 लाख नुकसान भरपाई द्या

सहकार मंत्रालयाने सहनिबंधक सहकारी संस्था गट अ या संवर्गातून अपर निबंधक पदावर आठ अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन नियुक्त्या केल्या आहेत. सहकार विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे.

तर पणन मंत्री हे भाजपचे आहेत. असे असताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पणन विभागाशी संबंधित प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये विश्वासात घेतले नसल्याची तक्रार पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजते. त्याची तत्काळ दखल घेण्यात आल्याचेही मंत्रालयातील सूत्रांकडून समजले.

Devendra Fadnavis
Junnar Hotel Attack: हॉटेलमध्ये घुसून धुडगूस,मारहाण, तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी; ओतूर पोलिसांत गुन्हा दाखल

त्यामध्ये अपर निबंधक नियुक्त्यांमध्ये राज्याचे पणन संचालक पदी नियुक्त पणन संचालक पदी वर्णी लागलेले बाजीराव शिंदे, नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रविण वानखेडे, पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीमधील सचिवपदी नियुक्त संगीता डोंगरे, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्त योगिराज सुर्वे यांचा समावेश आहे. या विषयावर आता पुढील आठवड्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सहकार आयुक्तालयाचे बळकटीकरण

पुण्यातील सहकार आयुक्तालयातील सहकारचे विद्यमान अपर निबंधक पी.एल. खंडागळे (पतसंस्था) यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या जागी मिलिंदसेन भालेराव यांची नियुक्ती झाली आहे. तसेच साखर आयुक्तालयातील सह संचालक (अर्थ) सचिन रावल यांची सहकार आयुक्तालयात अपर निबंधकपदी (तपासणी व निवडणूक) पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे सहकार आयुक्तालयातील सर्व मुख्य पदावंर आता अधिकारी कार्यरत होऊन आयुक्तालयाच्या कामकाजाला आणखी बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.

पुणे येथील पणन संचालनालयातील सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांची अपर निबंधकपदी पदोन्नती होऊन त्यांना पुण्यातच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर तेथील सहनिबंधक व मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली रावल ठाकुर यांची अपर निबंधकपदी पदोन्नती होऊन त्यांना पुण्यातच साखर संकुल येथील महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आस्थापना सहकारची, पणनचा नियुक्त्यांत शिरकावचा ट्रेंड

सहकार आयुक्तालयाच्या आस्थापनेवर कार्यरत अधिकारी पणन विभागासह साखर व अन्य विभागात नियुक्त केले जातात. त्यामुळे नियुक्त्यांचा अधिकार सर्वस्वी सहकार विभागाचा आहे. शिवाय अपर निबंधकांच्या नियुक्त्यांपुर्वी मुख्यमंत्री कार्यालयाचीही मान्यता घेतल्यावरच हा बदल झालेला आहे. मात्र, पणन मंत्र्यांनी हस्तक्षेप करीत आता नियुक्तांना आडकाठी आणण्याचा नवा ट्रेंड यावरुन सुरु झाल्याचीही चर्चा सहकार व पणन वर्तुळात आता सुरु झाल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news