PMPML bus accident Pune: कचरावेचकांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर; मोहन जगधने यांच्या कुटुंबीयांना 10 लाख नुकसान भरपाई द्या

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कचरावेचक मोहन जगधने यांच्या कुटुंबीयांना 10 लाख नुकसानभरपाई द्या; कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेची मागणी
accident
accidentfile photo
Published on
Updated on

पुणे: पौड रोड परिसरात गेल्या 15 वर्षांपासून घंटागाडीवर कचरावेचक म्हणून काम करणारे मोहन पाराजी जगधने (वय 43, रा. गोसावीवस्ती, कर्वेनगर, कोथरूड) यांचा पीएमपीएमएल बसच्या धडकेत गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

या घटनेमुळे कचरावेचकांच्या सुरक्षिततेचा आणि सामाजिक संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कुटुंबाला 10 लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि कचरावेचकांसाठी अंशदायी आरोग्य योजना लागू करण्याची मागणी कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेकडून करण्यात आली आहे.

accident
Junnar Hotel Attack: हॉटेलमध्ये घुसून धुडगूस,मारहाण, तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी; ओतूर पोलिसांत गुन्हा दाखल

24 एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कोथरूड येथील सह्याद्री हॉस्पिटलजवळ स्मिता एक्स्पर्टसमोर मोहन जगधने घंटागाडीवर काम करीत होते. त्या वेळी मागून आलेल्या पीएमपीएमएल बसने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली होती.

अपघातानंतर उपचारासाठी तातडीने 50 हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागली. ही रक्कम कुटुंबीयांनी उसनवारी करून जमा केली. तब्बल 27 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 21 मे रोजी रात्री मोहन जगधने यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार असून, त्यांच्या पत्नीही कचरावेचक म्हणून काम करतात.

accident
Katraj Dairy meeting: कात्रज दूध संघ पदाधिकारी बदलावर सोमवारी निर्णय?

या घटनेनंतर कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने पीएमपीएमएल प्रशासनावर तीव नाराजी व्यक्त केली आहे. अपघातामुळे एका कष्टकरी कचरावेचकाचा जीव गेला असताना पीएमपीएमएलकडून केवळ 50 हजार रुपयांची मदत करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

‌‘कचरावेचक शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही त्यांच्या सुरक्षिततेकडे आणि आरोग्याच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. मोहन जगधने यांच्या मृत्यूतून या कष्टकरी घटकांच्या सामाजिक संरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज आहे,‌’ असे संघटनेचे सरचिटणीस योगेश मंजुळा यांनी म्हटले आहे.

संघटनेने पीएमपीएमएलकडे मोहन जगधने यांच्या कुटुंबाला तातडीने 10 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची तसेच पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कचरावेचकांसाठी अंशदायी आरोग्य योजना सुरू करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news