पुणे : सहकाराला केंद्रातून बळ ! अधिकार्‍यांना हव्या त्या ठिकाणी बदल्या दिल्याची ओरड

पुणे : सहकाराला केंद्रातून बळ ! अधिकार्‍यांना हव्या त्या ठिकाणी बदल्या दिल्याची ओरड
Published on
Updated on

किशोर बरकाले

पुणे : केंद्र सरकारमध्ये नव्याने सहकार मंत्रालय सुरू करून धोरणात्मक निर्णय घेत सहकारक्षेत्राला पाठबळ दिले जात असल्याने सकारात्मक वातावरणनिर्मिती होत आहे. तर देशात सहकारक्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात मात्र सहकार मंत्रालयाची पावले त्यादृष्टीने पडण्याची अपेक्षा विशेषतः नागरी सहकारी बँका, पतसंस्था, सहकारी साखर कारखान्यांना निश्चित आहे. दुर्दैवाने सहकार मंत्रालयाकडून केवळ 'वजन' वापरून फिल्डिंग लावलेल्या अधिकार्‍यांना हव्या त्या ठिकाणी बदल्या देऊन बळ दिल्याची उघड ओरड सहकार विभागात सुरू झालेली आहे.

सहकार विभागातील जून महिनाअखेरच्या बदल्यांच्या हंगामामुळे राज्यातील बदलीपात्र अधिकारी प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या पुण्यातील सहकार आयुक्तालयात कमी आणि मुंबईत सहकार मंत्रालयात तळ ठोकून अधिक बसल्याची चर्चा गेले दोन महिने सुरू आहे. त्यानुसार इच्छुकांनाही आपले सर्व 'वजन' वापरून हव्या त्या ठिकाणी बदल्या करण्यासाठी रस्सीखेच करावी लागल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शिवाय, सहकार आयुक्तालयातून गेलेल्या प्रस्तावानुसार प्रत्यक्षात किती अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या, हा प्रश्नच आहे.
एकीकडे केंद्र सरकार धोरणात्मक निर्णय घेऊन अगदी गावच्या विकास सोसायट्यांचे संगणकीकरण करीत सर्वांगीण विकासावर लक्ष देत आहे. तशी यंत्रणा राज्याच्या सहकार मंत्रालयातून स्वतःहून झाल्याचे दृष्टिपथात येत नसल्याची टीकाही सहकार क्षेत्रातून दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

दीपक शिंदे पुन्हा पुण्यातील 'पणन'मध्येच…

सहकार विभागाचे सहनिबंधक दीपक शिंदे यांची पुण्यातील राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक व कार्यकारी संचालकपदावरून 16 जून रोजी लातूर विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त होणार्‍या पदावर बदलीचे आदेश शासनाने काढले. मात्र, 15 दिवसांतच शिंदे यांच्या बदलीचे ठिकाण बदलून पुण्यातील पणन संचालनालयातील सहसंचालक (पणन) या ठिकाणी 'प्रशासकीय कारण' पुढे करून व मूळ आदेशात अंशतः बदल करून सुधारित पदस्थापना सहकार मंत्रालयाने केली आहे. त्याचीच मोठी चर्चा शनिवारी सहकार व पणन विभागात सुरू होती.

दरम्यान, 30 जून रोजी झालेल्या बदल्यांमध्ये प्रामुख्याने वर्धा येथील जिल्हा उपनिबंधक किरण सोनवणे यांची सहकार आयुक्तालयातील उपनिबंधकपदी (नागरी पतसंस्था) बदलीचे आदेश शासनाने दिले आहेत. साखर आयुक्तालयातील सहायक संचालक (उपपदार्थ) अलका पवार यांची बदली 23 मे रोजी प्रथम सोलापूर येथील प्रादेशिक उपसंचालक (साखर) पी. ए. साठे यांच्या बदलीने रिक्त होण्यावर जागेवर करण्यात आली होती. ती बदलून पुण्यात पणन उपसंचालकपदी करून सुधारित पदस्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news