

शंकर कवडे
पुणे: राज्यासह शहरस्तरावर नेतृत्वाची वाणवा, मागील काही दिवसांपासून पक्षातील अखंड सुरू असलेली गळती तसेच मित्रपक्षांनी पाठ फिरविल्यानंतरही काँग््रेासने या निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळविले. एकीकडे भाजपच्या लाटेत अन्य पक्षांची वाताहत झाली असताना काँग््रेासचे यंदा 15 उमेदवार निवडून आले. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत जेमतेम 11 जागांवर समाधान मानावे लागलेल्या या पक्षाने यंदा 4 जागांची भर घालत 15 जागांपर्यंत मजल मारली आहे. गेली दहा वर्षे सातत्याने घसरत असलेल्या काँग््रेासच्या आलेखाला अखेर पुणेकरांनी ‘हात’ दिल्याचे चित्र शहरात दिसून येते.
लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर काँग््रेासला मोठे अपयश आले होते. यादरम्यान, महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर महापालिका निवडणुकांत आघाडी होणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांनी काँग््रेासचा हात सोडून भाजपवासी होण्यात धन्यता मानली. काहींनी पक्षापासून फारकत घेतली, तर काहींनी निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षांत प्रवेश केला. अनेक ज्येष्ठ नेते पक्ष सोडून गेल्यानंतर त्यांच्या जागा व त्यांच्या आग््राहास्तव दिल्या जाणाऱ्या जागा रिक्त झाल्या. महाविकास आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत सर्वस्व गमावलेल्या शिवसेनेची ‘मशाल’ हाती घेत काँग््रेास रिंगणात उतरली. आघाडीत असलेल्या मनसेबाबत बोलणे टाळून तो शिवसेनेचा मुद्दा असल्याचे नमूद करत थेट संपर्कावर भर देण्यात आला.
काँग््रेासने लढविलेल्या निम्म्या जागांवर यंदा तरुण उमेदवार व महिलांना संधी देण्यात आली, तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही आघाडीतील जागावाटपातील गोंधळामुळे अनेक प्रभागांत विरोधकांसोबतच मित्रपक्षांच्या उमेदवारांविरुद्ध मैत्रिपूर्ण लढती लढाव्या लागल्या. निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्र्यासह विद्यमान आमदारांनी स्थानिक पातळीवरील काँग््रेासला बळ देण्याचे काम केले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदा, सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. ‘राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत’ हा संदेश ठसवण्यात सुरुवात झाल्याचा परिणाम कोंढवा-कौसरबागेत दिसून आला. त्यानंतर तत्काळ बूथवरील अजित पवारांचा फलक हटवून त्याजागी सुप्रिया सुळे यांचा फोटो लावण्यात आला. मात्र, हाच संदेश अन्य प्रभागांत पोहोचविण्यात काँग््रेास कमी पडली. प्रशांत जगतापांच्या प्रवेशासोबतच त्यांच्या रूपाने अन्य नगरसेवकांची भर पडली.
आघाडी करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शिवसेना (उबाठा) यांच्याशी युतीची चर्चा सुरू असताना काँग््रेासकडून वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्यासोबत चर्चा फिस्कटल्याने काँग््रेासने 41 प्रभागांतील 90 जागी आपले उमेदवार उभे केले. उमेदवारच मिळत नसल्याने काही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना काँग््रेासच्या चिन्हावर उभे केले. एकीकडे शहरात भाजप आणि राष्ट्रवादीचा आक्रमक प्रचार होत असताना काँग््रेासचीही धडपड सुरू होती. अनेक अडथळ्यांवर मात करत काँग््रेासने दमदार लढत दिली. त्याचे फळ पक्षाच्या पदरात पडले. 2017 च्या तुलनेत दोन आकडी जागांचा टप्पा गाठत पक्षाने पुनरुज्जीवनाची चाहूल दिली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
महापालिका निवडणुकीत 15 जागांवर विजय मिळवत पुणे शहरातील प्रमुख पक्ष म्हणून काँग््रेासने पुन्हा आपले स्थान प्रस्थापित केले. यामध्ये प्रभाग क्र. 6 मध्ये चार उमेदवार, प्रभाग क्र. 13 आणि 19 मध्ये तीन, प्रभाग क्र. 11 आणि 18 मध्ये दोन, तर प्रभाग क्र. 22 मध्ये एक उमेदवार विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ही निवडणूक काँग््रेाससाठी आशादायी ठरली आहे, यात शंका नाही.