

पुणे: जुन्या बहरातील मोसंबीला गोडी आली असून थंडी काहीशी कमी झाल्याने मोसंबीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून जुन्या बहरासह मृगबहरातील मोसंबी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे.
त्यातुलनेत मागणी अधिक असल्याने मोसंबीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, अहिल्यानगर भागातून संत्रीची आवक दुपटीने वाढली आहे. मागणी अभावी त्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून बोरांची आवक रोडावली असून मोहोळ आणि सोनेरी भागातून बोरांची आवक होत आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मागणीपेक्षा आवक खूपच कमी असल्याने बोरांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पेरूच्या भावातही वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. 18) मोसंबी 25 ते 20 टन, संत्रा 40 ते 50 टन, डाळिंब 30 ते 40 टन, पपई 13 ते 14 टेम्पो, लिंबांची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 8 ते 10 टेम्पो, खरबूज 10 ते 13 टेम्पो, पेरू 200 ते 300 क्रेट, अननस 5 ट्रक, बोरे 600 ते 700 पोती, तर गोल्डन सीताफळाची 15 ते 20 टन इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे :
लिंबे (प्रतिगोणी) : 100-600, मोसंबी : (3 डझन) : 320-400, (4 डझन) : 25-300, संत्रा : (10 किलो) : 2500-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 80-250, आरक्ता : 40-150, गणेश : 5-30, कलिंगड : 10-25, खरबूज : 10- 30, पपई : 10-30, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरू (20 किलो) : 600-700, अननस (1 डझन): 100-600, बोरे (10 किलो) : चमेली 500-650, चेकनट 1000-1200, उमराण 180-250, चण्यामण्या 1100- 1300. सफरचंद : वॉशिंग्टन (14 ते 16 किलो) : 2500-4500, शिमला (22 किलो) : 1000- 1200.