file photo
file photo

पुणे : रॅप साँग प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती

Published on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात चित्रित केलेल्या अश्लील रॅप साँग प्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाने माजी पोलिस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

डॉ. उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस, निवृत्त कॅ. चंद्रशेखर चितळे, आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ. विलास आढाव आणि उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे (सदस्य सचिव) आदींचा समावेश आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news