

बारामती : पुढारी वृत्तसेवा
शहराजवळील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या एका युवतीने महाविद्यालयाच्या वसतीगृहात गळफास घेवून आत्महत्या केली. शरयू संदीप रणवरे (वय २०, रा. वडापूरी, ता. इंदापूर) असे या युवतीचे नाव आहे.
शरयूने मंगळवारी (दि. २४) रात्री साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकऱणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवतीने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणावरून केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.