मुलगी शिकली, न्यायाधीश झाली; पुण्यातील किराणा दुकानदाराच्या मुलीची गगनभरारी | पुढारी

मुलगी शिकली, न्यायाधीश झाली; पुण्यातील किराणा दुकानदाराच्या मुलीची गगनभरारी

 अनक्षा दिवटे

“माझ्या जवळ शिक्षणासाठी पैसे नव्हते म्हणून इच्छा असूनही मला शिकता आले नाही. मला चार मुली आणि एक मुलगा आहे. माझे पुण्यातील घोरपडे पेठ भागात किराणा दुकान आहे. मला शिकता आले नाही म्हणून मी जिद्दीने मुलींना उच्चशिक्षण दिले. आज माझ्या शहनवाजने आमच्या घराचे समाजाचे नाव मोठे केले.” हे उदगार आहेत नुकतीच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या शहनवाजचे वडील अमानखा पठाण यांचे.

Texas school shooting : अमेरिका हादरली! आधी आजीवर गोळ्या झाडल्या अन् नंतर त्यानं शाळेत जाऊन १९ मुलांना ठार मारलं!

पुणे शहरातील घोरपडे पेठ भागातील मध्यमवर्गींय मुस्लिम कुटुंबातील शहनवाज अमानखा पठाण ही नुकतीच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी या परिक्षेत पास झाल्याने त्यांचा घरात मुलगी शिकली न्यायाधीश झाली असाच जल्लोष झाला. नुकताच प्रथमवर्गन्याय दंडाधिकारी परिक्षांचा निकाल जाहीर झाला. त्या यादीत शहनवाजचे नाव झळकताच किराणा दुकान चालवून मुलींना शिक्षणासाठी पाहिजे ती मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आई बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले.

Instagram Down : ब्रेकिंग! भारतात इन्स्टाग्राम डाऊन; युजर्संना इन्स्टाग्राम वापरण्यात अडचणी

पुढारीने जेव्हा शहनवाजला फोन केला तेव्हा ती म्हणाली,”माझ्या बाबांनी मुलगा,मुलगी असा भेद कधी केला नाही आम्ही सुरुवातीला घोरपडे पेठ भागात राहत होतो. तेथे खूपच छोटे घर होते. तेथेच शिक्षणाचे बाळकडू आई-बाबांनी दिले. आता आम्ही कोंढवा भागात राहतो. घरची परिस्थिती बेताचीच पण आई-बाबांनी कधी काही कमी पडू दिले नाही. मी महर्षी अण्णासाहेब शिंदे या जिल्हा परिषद शाळेत. पुढे अबेदा इनामदार कॉलेजात शिकली. ए.के.खान आझम कॅम्पस येथून एलएलबी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एलएलएम पूर्ण केले. माझी परिक्षा दोन वर्षीपूर्वींच झाली होती मात्र कोविडमुळे विलंब झाला.

चार बहिणी आणि एक भाऊ..

शहनवाजची आई सुरगाबी पठाण या गृहीणी असून वडील अमानखा यांना त्यांची चांगली साथ आहे. छोटेसे किराणा दुकान असूनही आपण सर्व मुलांना चांगले शिकवू असे स्वप्न त्यांनी पाहिले आणि आज त्याचे सार्थक झाल्याचे आईने पुढारीशी बोलताना सांगितले.

माझ्या लेकीचे यश पाहुन आंनंदाश्रृ तरळले. कारण माझी परिस्थिती बेताचीच होती.पण जिद्द सोडली नाही. माझ्या चारही मुलींना मी उच्चशिक्षित केले. शहनवाजने न्यायाधीश परिक्षेत यश मिळवले याचा अभिमान वाटतो. माझ्या मेहनतीचे तीने चिज केले. आमचे घराणे आणि समाजाचेही नाव मोठे केले.

-अमनखा पठाण,वडील

Back to top button