Crime News: इन्स्टाग्रामवरील लिंक क्लिक करणे पडले महागात; महिलेची 36 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक

याप्रकरणी नाग्रस रोड औंधमधील 44 वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune Crime News
न्स्टाग्रामवरील लिंक क्लिक करणे पडले महागात; महिलेची 36 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक File Photo
Published on
Updated on

पुणे: इन्स्टाग्रामवरील शेअर मार्केटची लिंक ओपन करणे एका खासगी कंपनीतील महिला अधिकार्‍याला चांगलेच महागात पडले. त्यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 36 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी नाग्रस रोड औंधमधील 44 वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.(Latest Pune News)

Pune Crime News
Pune Crime: दोस्त दोस्त ना रहा! मैत्रिणीने चहासाठी घरी बोलावलं अन् डोळ्यात मिरची टाकून...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मगरपट्टामधील एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांना इन्स्टाग्रामवर एका शेअर मार्केट संदर्भातील लिंक आली होती. त्यांनी लिंक ओपन केली असता, त्यांना एका व्हॉटसअ‍ॅप ग्रुपला अ‍ॅड करण्यात आले होते. यामध्ये 200 जणांचा एक ग्रुप होता.

यामध्ये सुरुवातीला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर फिर्यादीला तिचे शेअर मार्केटमध्ये खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड आदी कागदपत्रे मागविण्यात आली. फिर्यादीने सुरवातीला 50 हजारांची गुंतवणूक करून खाते उघडले, तेव्हा फायदा होत असल्याचे दिसले.

Pune Crime News
Vaikunth Power Outage: विद्युतपुरवठा खंडित झाल्याने वैकुंठमध्ये अंत्यविधीसाठी वेटिंग

यानंतर फिर्यादीने 36 लाख 50 हजार गुंतवणूक केली, तेव्हा तिला तिचा फायदा 68 लाख रुपये झाल्याचे दिसून येत होते. तेव्हा तिने ग्रुपवर रक्कम काढण्याची विनंती केली. त्यांनी खाते व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता, तिने तुम्हाला दोन लाख शेअर दिले आहेत. ते पहिले खरेदी करावे लागतील, असे सांगितले. फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्यांना लोन देण्यात येईल, असे सांगितले.

फिर्यादीने लोन घेण्यास नकार दिला, तेव्हा त्यांना तुमचे बँक खाते, संपत्ती सील केली जाईल. तसेच, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली. फिर्यादीने ग्रुपमधील एकाशी फोनवर संपर्क साधला असता, त्यानेही अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे सांगितले. यामुळे फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news