Pune News : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन

Pune News : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन
Published on
Updated on

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा येथे पर्यटन मंत्रालयाने 27 सप्टेंबर 2023 रोजी साजरा होणार्‍या पर्यटन क्षेत्राला समर्पित "ट्रॅव्हल फॉर लाइफ" हा कार्यक्रम सादर करण्याचे नियोजन केले असून यामध्ये स्वच्छता मोहिम हा कार्यक्रमही होणार आहे. 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

पर्यटन मंत्रालयाने संपूर्ण भारतामधील या उपक्रमासाठी 108 स्थळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम आणि मध्य प्रादेशिक कार्यालय, पर्यटन मंत्रालय, युवा पर्यटन क्लबचे सदस्य, स्थानिक समुदायिंचा समावेश केला आहे. महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या ठिकाणी जागतिक पर्यटन दिन आणि स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती उपसंचालक पर्यटन मंत्रालय महेश अय्यंगार यांनी दिली आहे.

  • 27 सप्टेंबर 2023 (बुधवार)
  • सकाळी 10.00 स्वच्छता मोहीम (स्थळ: शनिवार वाडा, पुणे)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news