Pune Ganeshotsav 2023 : अजित पवारांकडून गणेश मंडळांचा गौरव | पुढारी

Pune Ganeshotsav 2023 : अजित पवारांकडून गणेश मंडळांचा गौरव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मानाच्या गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांना भेट देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाप्पांचे दर्शन घेतले. या वेळी गणेश मंडळांचा लोकसेवेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पुण्याची ग्रामदेवता कसबा गणपतीसह सर्व मानाच्या गणपतींचे तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ, भोलेनाथ मित्रमंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतींचे पवार यांनी दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत शहराध्यक्ष दीपक मानकर, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, युवती अध्यक्ष पूजा झोळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा

मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनविण्याचा संकल्प करा ; खासदार सुजय विखे यांचे आवाहन

विकासकामे केली, पण देखावा नाही : आमदार राम शिंदे

दुर्दैवी ! संसाराचा सुरुवाती आधीच शेवट ; नवदांपत्याचा अपघाती मृत्यू

Back to top button