भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष दिलीप गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, शिवाजी हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता जाधव, माजी नगराध्यक्षा एड. विद्याराणी साळुंखे, रणजित नाना पाटील यांच्या हस्ते सामन्यांना प्रारंभ झाला. बक्षीस वितरण दिलीप गुरव, लिबर्टीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, एड. मानसिंगराव पाटील, रणजित नाना पाटील, सचिन पाटील, सचिव रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. मुनीर बागवान सावकार, विजय गरुड, दादासाहेब पाटील, एकनाथ बागडी, आशपाक मुजावर, किशोर शिंदे, विजय कुलकर्णी, राजेंद्र जाधव, एकनाथ बागडी, लिबर्टीचे सर्व संचालक, आजी माजी खेळाडू व क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.