माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज आळंदीत

मुख्यमंत्री इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची करणार पाहणी
Chief Minister Shinde in Alandi today for Maulis palanquin departure ceremony
मुख्यमंत्री इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची करणार पाहणी File Photo
Published on
Updated on

आळंदी : पुढारी वृत्तसेवा

संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदीत येणार आहेत. दुपारी तीन वाजता ते आळंदीत असणार आहेत. यावेळी ते पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणार असून, त्यानंतर इंद्रायणी नदी प्रदूषणाची देखील पाहणी करणार आहेत.

Chief Minister Shinde in Alandi today for Maulis palanquin departure ceremony
आयुष्यात मनाच्या कळीला तरुण ठेवा-आशा भोसले; 'स्वरस्वामिनी आशा' प्रकाशन सोहळा

यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पालखी सोहळ्यात मंदिरात येत दर्शन घेतले होते; मात्र मुख्यमंत्री प्रस्थान सोहळ्यात येण्याची पहिलीच वेळ आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेतात याबरोबरच पालखी सोहळ्यातील दिंड्यांना २० हजार रूपयांचे अनुदान वाटप बाबत टिकेची झोड उटल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Chief Minister Shinde in Alandi today for Maulis palanquin departure ceremony
Sunita Williams|बोईंग स्टारलायनरचा अंतराळातील मुक्काम वाढणार

आळंदी नगरपरिषद तुळशी वृंदावन उद्यानाचे उदघाटन, वारकरी छत्री व रेनकोट वाटप या कार्यक्रमांना देखील ते हजेरी लावतील, असे सांगण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे आळंदीत असणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news