पिंपरी शहरात ‘चंद्रयान 3‘ मोहिमेचा जल्लोष

पिंपरी शहरात ‘चंद्रयान 3‘ मोहिमेचा जल्लोष

पिंपरी : भारताने अवकाशात सोडलेले चंद्रयान 3 चे लँडर चंद्रावर उतरणार्‍या दिवसाची सर्व भारतीय आतुरतेने वाट पाहत होते. हे लँडर 40 दिवसांनी चंद्रावर उतरले. ही भौगोलिक घटना पाहण्याची प्रतीक्षा बुधवारी (दि. 23) रोजी संपली. नागरिकांना चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरतानाच्या घटनेचे साक्षीदार होण्याच्या संधीचा अनेकांनी लाभ घेतला. चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर यशस्वी उतरल्यानंतर सर्वत्र जल्लोष करण्यात आला.

शहरात सर्व नागरिकांनी मोबाईल, टीव्हीवर या घटनेचे थेट प्रक्षेपण पाहिले. लँडरचे चंद्रापासूनचे अंतर जसजसे कमी होत होते, तशी नागरिकांची उत्कंठा वाढत होती. विक्रम लँडर जसजसे चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ आले त्या वेळी नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. यशस्वी लँडिग झाल्यानंतर आबालवृद्धांसह सर्वांनी आनंदाने उड्या मारून आनंद व्यक्त केला.

सोशल मीडियातून शुभेच्छा

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा पहिला मान मिळविला आहे. ही ऐतिहासिक घटना आणि त्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य भारतीयांना बुधवारी (दि. 23) मिळाले. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव केला. भारताची शान इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन, आमच्या झेंड्यावर चंद्र नाही तर आमचा झेंडा चंद्रावर आहे. अब चाँद मुठ्ठी में असे अनेकांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर चंद्रयानाच्या यशस्वी लँडिंगचे स्टेटस ठेवले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news