Chandraprabha 2026 Music Festival: वाघोलीत रंगणार ‘चंद्रप्रभा २०२६’ संगीत महोत्सव; दिग्गज कलाकारांची सुरेल मैफल

२८ नोव्हेंबरला आयोजन; उस्ताद तौफिक कुरेशी, साबिर खान आणि पं. आदित्य कल्याणपूर यांची विशेष प्रस्तुती
Music Festival
Music FestivalPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा, वाद्यसंगीतातील नावीन्य आणि दिग्गज कलाकारांच्या सुरेल सादरीकरणातून संगीतप्रेमींना अविस्मरणीय सांगीतिक अनुभव देणाऱ्या 'चंद्रप्रभा २०२६' या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या वतीने संस्थेचे संस्थापक दिवंगत सद्गुरू प्रभाकर सरदेशमुख महाराज आणि ज्येष्ठ सतारवादक पंडित चंद्रकांत सरदेशमुख यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) सायंकाळी ५ ते रात्री ९.३० या वेळेत वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या क्रीडांगणावर हा संगीत सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी 'पुढारी' माध्यम समूह माध्यम प्रायोजक आहे.

Music Festival
Pune Court Bomb Threat: पुणे जिल्हा न्यायालयाला २१ दिवसांत दुसऱ्यांदा बॉम्बची धमकी; ई-मेलमुळे न्यायालयीन कामकाज ठप्प!

यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्ष असून, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह दिग्गज कलाकारांच्या कलेचा आनंद रसिकांना घेता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. भारतीय संगीत परंपरेतील विविध वाद्यांचे वैशिष्ट्य, शास्त्रीय संगीताची समृद्धता आणि नव्या संगीतप्रयोगांची अनुभूती या महोत्सवातून मिळणार आहे. प्रभाकर सरदेशमुख महाराज यांचे अध्यात्म आणि आयुर्वेद क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण होते. तसेच, ते संगीतज्ज्ञही होते. तर पंडित चंद्रकांत सरदेशमुख हे प्रसिद्ध सतारवादक होते. या दोन महान कलाकारांच्या स्मृती जपण्याबरोबरच संगीतकलेला प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जात असल्याचे ट्रस्टचे विश्वस्त सुश्रुत सरदेशमुख यांनी सांगितले. या महोत्सवात संगीतविश्वातील दोन दिग्गज कलाकार दिवंगत उस्ताद सुलतान खान आणि उस्ताद झाकीर हुसैन यांच्या स्मृतींना संगीतमय आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

Music Festival
Sinhgad Education Society Property Tax Dues: सिंहगड शिक्षण संस्थेच्या २३० कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम; मिळकती सील करून लिलावाची तयारी!

दोन सत्रांत रंगणार संगीत मैफल

महोत्सवाचे आयोजन दोन सत्रांमध्ये करण्यात आले आहे. पहिल्या सत्राची सुरुवात अक्षय सोमण यांच्या एकल व्हायोलिन वादनाने होणार आहे. त्यानंतर 'गुरुकृपा व्हायोलिन ब्रीथलेस बँड'ची विशेष प्रस्तुती होईल. या सादरीकरणात व्हायोलिन, बासरी, गिटार, तबला, की-बोर्ड, ड्रम्स आणि पर्कशन अशा विविध वाद्यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे. राजसी सोमण, अझरुद्दीन, अभिजित यादव, अभिजित बारटक्के, शांतनू पांडे आणि रोहन वणगे हे कलाकार या सादरीकरणात सहभागी होणार आहेत. दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार उस्ताद तौफिक कुरेशी (जेम्बे), उस्ताद साबिर खान (सारंगी) आणि पंडित आदित्य कल्याणपूर (तबला) यांची विशेष सांगीतिक प्रस्तुती होणार आहे.

Music Festival
Pune Theatre Revenue: पुण्यातील नाट्यगृहांच्या उत्पन्नात मोठी तफावत; बालगंधर्वची ५० लाखांची कमाई, उपनगरांतील सभागृहांची स्थिती बिकट!
  • कार्यक्रम कधी: शनिवार, २८ नोव्हेंबर

  • वेळ: सायंकाळी ५ ते रात्री ९.३०

  • स्थळ: भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे क्रीडांगण, विश्वशांती धाम, केसनंद रस्ता, वाघोली.

  • येथे मिळतील तिकिटे: बुक माय शो आणि कार्यक्रमस्थळी उपलब्ध

  • अधिक माहितीसाठी श्रीकांत गुजराथी यांच्याशी ७०२८००५८४३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Music Festival
Bay of Bengal Cloud Pollution: बंगालच्या उपसागरातील प्रदूषित ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण २० टक्के, बर्फाचे प्रमाण ४३ टक्क्यांनी अधिक!

सद्गुरू प्रभाकर सरदेशमुख महाराज आणि पं. चंद्रकांत सरदेशमुख यांच्या स्मृती जपण्यासह संगीत क्षेत्रासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण व्हावे, या उद्देशाने 'चंद्रप्रभा' महोत्सवाची संकल्पना पुढे आली. भारतीय संस्कृतीमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संगीत परंपरेचा सन्मान करताना नवोदित कलाकार आणि संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार या दोघांनाही एकाच व्यासपीठावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या कलेतून रसिकांना संगीताचा समृद्ध अनुभव मिळावा आणि महान कलाकारांच्या स्मृतींना स्वरांजली अर्पण करता यावी, हा या आयोजनामागील उद्देश आहे. माझे वडिल प्रा. डॉ. सदानंद सरदेशमुख हे ट्रस्टचे अध्यक्ष असून, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट आणि सरदेशमुख कुटुंबिय मिळून हा महोत्सव आयोजित करत आहोत.

सुश्रुत सरदेशमुख, विश्वस्त, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.