Pune Court Bomb Threat: पुणे जिल्हा न्यायालयाला २१ दिवसांत दुसऱ्यांदा बॉम्बची धमकी; ई-मेलमुळे न्यायालयीन कामकाज ठप्प!

बॉम्बशोधक पथकाकडून इमारतींची कसून तपासणी, संशयास्पद वस्तू आढळली नाही; बंद मेटल डिटेक्टर आणि सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह
Pune Court Bomb Threat
Pune Court Bomb ThreatPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: ‘बॉॅम्‍ब धमाके... पुणे कोर्ट कॉम्‍पलेक्‍स... २.३० बजे’ असा धमकीचा ई-मेल न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर सोमवारी (दि. २३) दुपारी पावणेदोनच्या सुमारास धडकताच न्यायालयीन यंत्रणेची धावपळ उडाली. बॉम्बशोधक पथकाने न्यायालयीन इमारती, दालने आणि वकिलांच्या चेंबरची कसून तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. परिसर सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास कामकाज पुन्हा सुरू झाले.

Pune Court Bomb Threat
Sinhgad Education Society Property Tax Dues: सिंहगड शिक्षण संस्थेच्या २३० कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम; मिळकती सील करून लिलावाची तयारी!

जिल्हा न्यायालयात नेहमीप्रमाणे सुनावण्या सुरू असतानाच धमकीच्या ई-मेलची माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आली. प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर खबरदारी म्हणून न्यायालयीन कामकाज थांबवून इमारती रिकाम्या करण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना इमारतींबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. अनेक न्यायाधीश आणि कर्मचारी अशोका हॉलसमोरील मैदानात जमा झाले.

Pune Court Bomb Threat
Pune Theatre Revenue: पुण्यातील नाट्यगृहांच्या उत्पन्नात मोठी तफावत; बालगंधर्वची ५० लाखांची कमाई, उपनगरांतील सभागृहांची स्थिती बिकट!

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालयाच्या आवारात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवेशद्वारांजवळ वकील आणि पक्षकारांची गर्दी झाली होती. तपासणी पूर्ण होईपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आल्याने अनेक सुनावण्यांवर परिणाम झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी २ नोव्हेंबर रोजीही न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. महिनाभरात दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याने न्यायालयाच्या सुरक्षेतील त्रुटी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

Pune Court Bomb Threat
Bay of Bengal Cloud Pollution: बंगालच्या उपसागरातील प्रदूषित ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण २० टक्के, बर्फाचे प्रमाण ४३ टक्क्यांनी अधिक!

बंद मेटल डिटेक्टरमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

न्यायालयाच्या विविध प्रवेशद्वारांवर सुरक्षेसाठी मेटल डिटेक्टर बसवले आहेत. मात्र, त्यापैकी अनेक यंत्रे बंद अवस्थेत असून, काही ठिकाणी त्यांच्याजवळ सुरक्षारक्षकही नसतात. नागरिकांची यंत्रांच्या बाजूनेच ये-जा सुरू असल्याने ही यंत्रणा केवळ नावापुरती उरली आहे. पहिल्या धमकीनंतर सुरक्षेतील या त्रुटी समोर येऊनही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. याखेरीज, बहुतांश ठिकाणी जुने फर्निचर तसेच पडून आहेत त्याठिकाणी कोणी काही साहित्य ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्यासह मेटल डिटेक्टर कार्यान्वित करून प्रवेशद्वारांवरील तपासणी अधिक कडक करण्याची गरज जिल्हा व सत्र न्यायालयातील फौजदारी वकील शुभम लोखंडे यांनी व्यक्त केली.

Pune Court Bomb Threat
100th Marathi Sahitya Sammelan: शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २७ ते ३० जानेवारीला; तारखांमध्ये बदल

न्यायालयाला अवघ्या २१ दिवसांत दुसऱ्यांदा बॉम्बची धमकी मिळणे ही गंभीर बाब आहे. अशा घटनांमुळे न्यायालयीन कामकाज विस्कळीत होऊन दूरवरून आलेल्या पक्षकारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. न्यायालयाच्या सुरक्षेसाठी केवळ धमकी आल्यानंतर तपासणी करून उपयोग नाही. प्रवेशद्वारांवरील तपासणी, मेटल डिटेक्टर आणि सीसीटीव्ही यंत्रणा कायमस्वरूपी सक्षम करणे आवश्यक आहे. तसेच धमकी देणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे.

ॲड. सुशांत तायडे, फौजदारी वकील, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.