Chandni Chowk Bhugaon Flyover: चांदणी चौक ते भूगाव प्रवास होणार सुसाट! महापालिकेचा २०३ कोटींचा उड्डाणपूल-ग्रेड सेपरेटर प्रकल्प मंजूर

८० टक्के भूसंपादन झाल्यावरच निविदा काढणार; राम नदीवर नवा पूल, दोन टप्प्यांत होणार काम; प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार.
Chandni Chowk Bhugaon Flyover
Chandni Chowk Bhugaon FlyoverPudhari
Published on
Updated on

पुणे : कोकणातून पुण्यात प्रवेश करताना चांदणी चौक परिसरात होणारी भीषण वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने मोठी पावले उचलली आहेत.

Chandni Chowk Bhugaon Flyover
Vasudev Lokkala Tradition End: ओवी-नादाची परंपरा संपतेय? स्मार्टफोनच्या युगात वासुदेव लोककलेचे अस्तित्त्व धोक्यात, गावाचा मंगल नाद विरळ

चांदणी चौक ते भूगाव या मार्गावर उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय इस्टिमेट कमिटीने मंजूर केला. या कामांसाठी तब्बल 203 कोटी निधीचा अंदाज आहे. आवश्यक असलेल्या जागेपैकी 80 टक्के भूखंड ताब्यात आल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

Chandni Chowk Bhugaon Flyover
Teachers Strike Pune TET: शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. ५) राज्यातील सर्व शाळा बंद आंदोलन

चांदणी चौक हे पुण्याचे पश्चिमेकडील प्रमुख प्रवेशद्वार आहे. पीरंगूट ते चांदणी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने या मार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या ठिकाणी रस्ते रुंदीकरणाचे काम महापालिकेने केले आहे. पुढे भूगावपर्यंत साधारण दोन किलोमीटर अंतरात महापालिकेची हद्द असून, विकास आराखड्यात 60 मीटर रस्त्याचा समावेश आहे. पुढील हद्दीनंतर पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड येणार असून, तो थेट राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. या वाढत्या संपर्कामुळे भविष्यात वाहतूकप्रवाह आणखी वाढणार असल्याने उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरची गरज भासली होती.

Chandni Chowk Bhugaon Flyover
Mohan Bhagwat Rashtramandir Pune: "राममंदिर झाले; आता राष्ट्रमंदिर!" डॉ. मोहन भागवत यांचे पुण्यातून मोठे आवाहन

गेल्या काही वर्षांत या भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढत 90 हजारांच्या आसपास पोहचली आहे. आगामी काळात ती दोन ते तीन लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत महापालिकेच्या प्रकल्प विभागाने दोन टप्प्यांत पूल व ग््रेाड सेपरेटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली.

Chandni Chowk Bhugaon Flyover
Palkhi Marg Sugarcane Traffic: पालखी महामार्गावर 'विनारिफ्लेक्टर' ऊस वाहतुकीमुळे अपघात वाढले; अरुंद रस्त्यांवर जीवघेणा प्रवास

रस्त्यावरच्या प्रमुख तीन चौकात ही कामे होणार आहेत. पीव्हीपीआयटी कॉलेज चौकातील ग्रेड सेपरेटर 430 मीटर लांबीचा व 23.2 मीटर रुंद असून, यातील 120 मीटर भाग आरसीसी रचनेचा असणार आहे. या प्रकल्पावर 27 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर एम्बोसिया चौक व पाटीलनगर चौक येथे 870 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला जाणार असून, त्यासाठी 82 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पूल सुरू झाल्यावर चांदणी चौक-भूगाव दरम्यान प्रवास वेळेची मोठी बचत होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

Chandni Chowk Bhugaon Flyover
Veterinary Service Doorstep Maharashtra: शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन पशुवैद्यकीय सेवा द्या! सेवेच्या ठिकाणी गैरहजर असल्यास थेट निलंबन

या मार्गावरून जाण्यासाठी राम नदीवरील नवीन 30 मीटर लांबीचा आणि 70 मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार आहे. नदी ओलांडताना होत असलेली कोंडी कमी करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी 80 टक्के जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

पृथ्वीराज बी. पी, अतिरिक्त आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news