मला कामानिमित्त सातत्याने सातारा रस्त्यावरून ये-जा करावी लागते. पूर्वी सातारा रस्त्यावर खड्डे नव्हते. मात्र, पाऊस सुरू झाल्यापासून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत आणि खडी निघालेली आहे. यामुळे दुचाकीचे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.– रमेश खरात, वाहनचालक