महत्त्वाची बातमी ! तलाठीपदाच्या परीक्षेचे वेळापत्रक, तारखा जाहीर | पुढारी

महत्त्वाची बातमी ! तलाठीपदाच्या परीक्षेचे वेळापत्रक, तारखा जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भूमिअभिलेख विभागाच्या वतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर यादरम्यान होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून, पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान 10 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे, तर परीक्षेचे पत्र आणि केंद्र तीन दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक तथा अपर जमाबंदी आयुक्त तसेच राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

रायते यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातून तलाठी पदाच्या 4 हजार 466 या पदांसाठी 11 लाख 10 हजार 53 उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असून, ही परीक्षा तीन सत्रात होणार आहे. त्यामध्ये सकाळी 9 ते 11, दुपारी 12 :30 ते 2:30 आणि सायंकाळी 4:30 ते 6:30 या वेळांचा समावेश आहे. ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून, परीक्षा केंद्र मात्र तीन दिवस अगोदर हॉल तिकिटाबरोबरच दिसणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.

अशा होणार परीक्षा पहिला टप्पा :
17, 18, 19, 20,
21, 22 ऑगस्ट
दुसरा टप्पा :26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर
तिसरा टप्पा : 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर

 हेही वाचा :

खुशखबर ! एमबीबीएस, बीडीएसच्या जागा वाढल्या

सिक्कीममध्ये कर्तव्य बजावत असताना दोन जवान शहीद

Back to top button