Chakan MIDC Problems: चाकण एमआयडीसीच्या समस्यांवर तातडीने तोडगा; उद्योजकांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे आश्वासन

वाहतूक कोंडी, रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत लवकरच बैठक; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना
Sunetra Pawar
Sunetra Pawar Pudhari
Published on
Updated on

पुणे: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते, वाहतूकक कोंडी आणि पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्योजकांना दिले. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Sunetra Pawar
Sugar Price Rise: साखर दरवाढीला केंद्राचा लगाम; कारखान्यांना सात दिवसांपेक्षा जास्त साठवणुकीवर बंदी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण नागरी कृती समिती आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. या वेळी चाकण एमआयडीसीतील उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेत त्यांनी त्या तातडीने सोडवण्याबाबत आश्वस्त केले.

Sunetra Pawar
Baramati Solar Agriculture Feeder Scheme: बारामती परिमंडलातील १.४३ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज; ५८ हजार सौर कृषी पंपांचा लाभ

चाकण एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत विस्तारली असून, त्यानुसार रस्ते आणि वाहतूकव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे उद्योजक तसेच कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Sunetra Pawar
Chakan Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून; पतीनेही गळफास घेऊन जीवन संपवले

अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी, जि. प.चे सीईओ गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

Sunetra Pawar
Katraj Kondhwa Road Widening: कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाला अखेर गती; मार्चअखेर प्रकल्प पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आश्वासन

चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेऊन सर्व प्रश्नांवर लवकरच मार्ग काढण्यात येईल. उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम करण्याला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news