

पुणे : राज्यातील बहुतांश भागात रविवारी पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस घाटमाथ्यावर झाला असून ताम्हिणी भागात १८० मि.मी. पावसाची नोंद झाली. राज्यात २३ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे.
हवेचे दाब हळूहळू अनुकूल होत असल्याने राज्यात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा भागात पावसाचा जोर जास्त आहे. मात्र, मराठवाडा, विदर्भात त्या तुलनेत कमी पाऊस आहे. २३ जुलैपर्यंत असा मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकण : वाकवली १५१, खेड १४४, तलासरी १००, पोलादपूर ७१, मंडणगड ७१, माथेरान ६१, चिपळूण ६१, शहापूर ५८, तळा ५२, दापोली ५०, म्हसळा ४६, उरण ४६, उल्हासनगर ४५, रोहा ४४, राजापूर ४४. मध्य महाराष्ट्र : राधानगरी ११३, गगनबावडा ९७, लोणावळा ९१, महाबळेश्वर ९०, इगतपुरी ५८, आजरा ५७, ओझरखेडा ५५, सांगोला ४५. मराठवाडा : पूर्णा ४६, नायगाव खैरगाव ३६, धर्माबाद ३३, खुलताबाद ३०, उमरी २९, मंठा २५, परभणी २३. विदर्भ : भंडारा ८०, भामरागड ६८, एटापल्ली ५१, लोणार ५०, बल्लारपूर ४१, भिवापूर ३६, नागभीड ३५, कुही ३४. घाटमाथा : ताम्हिणी १८०, शिरगाव १४०, वळवण १०१, लोणावळा १००, कोयना ९५, दावडी ८०, लोणावळा ७३, भिरा ६४, खोपोली ५६, डोंगरवाडी ५०, आंबोणे ३८.