

अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक स्थिर राहून दरात वाढ झाली आहे. भुईमूग शेंगा, वांगी, फरशी, वालवड, आले, काकडी, हिरवी मिरची, गाजर, ढोबळी मिरची यांची आवक वाढली आहे. वांगी, दोडका, चवळी, भेंडी, हिरव्या मिरचीचे भाव वाढले आहेत. एकूण उलाढाल ६ कोटी १० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १ हजार २०० क्विंटल झाली. कांद्याला कमाल भाव १,००० ते १,७०० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १,४०० क्विंटल झाली. बटाट्याला कमाल भाव १,६०० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक ५० क्विंटल झाली. लसणाला १२ हजार रुपये कमालभाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३४० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ४ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव: कांदा- एकूण आवक- १,२०० क्विंटल. भाव क्र. १- १,७०० रुपये, भाव क्र. २- १,३०० रुपये, भाव क्र. ३- १,०००. बटाटा- एकूण आवक- १,४०० क्विंटल. भाव क्र.१- १,६०० रुपये, भाव क्र. २- १,३०० रुपये, भाव क्र.३ - १,००० रुपये.
फळभाज्या- आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोला मिळालेला दर : टोमॅटो- ३०९ क्विंटल (१,५०० ते २,५०० रुपये), कोबी- १५५ क्विंटल (१,४०० ते १,८००), फ्लॉवर- १७० क्विंटल (१,००० ते २,०००), वांगी- ९० क्विंटल (२,००० ते ३,०००), भेंडी- ८४ क्विंटल (३,००० ते ४,०००), दोडका- ५२ क्विंटल (४,००० ते ५,०००), कारली- ६२ क्विंटल (३,५०० ते ५,०००), दुधीभोपळा- ४२ क्विंटल (१,००० ते २,०००), काकडी- ९५ क्विंटल (२,००० ते ३,०००), फरशी- १० क्विंटल (५,००० ते ७,०००), वालवड- १२ क्विंटल (६,००० ते ८,०००), ढोबळी मिरची- १०८ क्विंटल (३,००० ते ५,०००), चवळी- ३४ क्विंटल (२,५०० ते ३,५००), वाटाणा- ६० क्विंटल (६,००० ते ७,०००), शेवगा- ४० क्विंटल (२,५०० ते ३,५००), गाजर- ९० क्विंटल (१,००० ते २,०००), गवार- ५२ क्विंटल (३,००० ते ५,०००), आले- १४० क्विंटल (५,००० ते ७,०००).
पालेभाज्या : आवक जुड्यांमध्ये व मिळालेले दर : मेथी- एकूण ९ हजार ५६४ जुड्या (१,८०० ते २,२०० रुपये), कोथिंबीर- एकूण २८ हजार ९६० जुड्या (६०० ते १,२००), शेपू- एकूण ३ हजार ०११ जुड्या (१,००० ते १,५००), पालक- एकूण ३ हजार ८५० जुड्या (६०० ते १,०००).
जनावरे : बाजारात ४२ जर्सी गायींपैकी ३८ गायींची विक्री झाली. त्यांना १५ ते ७० हजार रुपये दर मिळाला. ५५ बैलांपैकी ४५ बैलांची विक्री झाली. बैलांना १० ते ४० हजार रुपये दर मिळाला. ८५ म्हशींपैकी ७० म्हशींची विक्री झाली.