

पुणे: देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीबंदी लागू झाल्याने बोटी किनाऱ्यावर परतल्या आहेत. तर, पूर्व किनारपट्टीवरील मासेमारीस सुरुवात झाली असली, तरी अद्याप मासळी उपलब्धता होत नसल्याने बाजारात खोल समुद्रासह खाडीतील ताज्या मासळीचा पुरवठा निम्म्यावर आला आहे. यामध्ये बोंबील, बांगडा आणि कोळंबीचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर, उर्वरित मासळी शीतगृहातून बाजारात दाखल होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने मासळीचे तेजीतील दर कायम आहेत.
मागणी आणि पुरवठा यांचा समतोल कायम असल्याने मटण आणि चिकनचे दर स्थिर आहेत. तर, पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अंड्यांच्या भावात शेकड्यामागे वीस रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मासळी बाजारात रविवारी (दि. 7) खोल समुद्रातील मासळी 4 ते ५ टन आणि नदीच्या मासळीची 4०० ते 5०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १2 ते 15 टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):
पापलेट : कापरी : 15००-16००, मोठे : १5००-००, लहान : १0००-१2००, हलवा : 10००-१2००, सुरमई १1००-१2००, रावस : ९0०-१0००, घोळ : ९००-१०००, पाला : १2००-१५००, वाम : पिवळी १0००, काळी : ५००-६००, ओले बोंबील : 5००-55०.
कोळंबी:
लहान : 28०-३0०, मोठी : 5००-6००, जम्बो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : 10००, मांदेली : १5०-20०, खेकडे : ३५०-४0०, चिंबोर्या : 60०-७0०. खाडीची मासळी - बांगडा : 30०-३५०.
नदीतील मासळी:
रहू : १६०-२००, कतला : १८०-२५०, मरळ : ३५०-४५०, खवली : २५०-३००, आम्ळी : १5०-२००, खेकडे : 30०-४००, चिलापी : ८०-20०, वाम : 60०-६5०. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २४०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०. अंडी : गावरान (शेकडा) ११2० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ६25, डझन ८४, प्रतिनग ७.