Chakan Market Yard Rates: कांदा-बटाट्याची विक्रमी आवक; मिरची, कोबी, फ्लॉवर तेजीत

लसणाची मोठी आवक; पालक, मेथी, कोथिंबीर दर कोसळले; 6.70 कोटींची उलाढाल
Onion Potato
Onion PotatoPudhari
Published on
Updated on

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, वाटाणा व गाजराची विक्रमी आवक झाली. हिरवी मिरची, चवळी व कोबी आणि फ्लॉवरचे भाव तेजीत राहिले. लसणाची प्रचंड आवक झाली. येथील पालेभाज्यांच्या बाजारात पालक, कोथिंबीर आणि मेथीची भरपूर आवक झाल्याने भाव कोसळले. एकूण उलाढाल 6 कोटी 70 लाख रुपये झाली.

Onion Potato
Pune Fruit Market Prices: रमजानमुळे फळांना मागणी वाढली; कलिंगड, खरबूज, पपई महाग

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण 9 हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला कमाल भाव 1,500 रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. बटाट्याला 1,200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 280 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 6 हजार रुपयांपासून ते 7,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Onion Potato
Pune Wholesale Market Rates: साखर, गूळ व खाद्यतेल स्थिर; हिरव्या वाटाण्याच्या दरात घसरण

शेतमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे: कांदा - एकूण आवक - 9,000 क्विंटल. भाव क्रमांक - 1. 1500 रुपये, भाव क्रमांक 2 - 1,200 रुपये, भाव क्रमांक 3 - 1,000. बटाटा - एकूण आवक - 1,500 क्विंटल, भाव क्रमांक 1. 1,200, भाव क्रमांक 2. 1,000 रुपये, भाव क्रमांक 3. 800 रुपये.

फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे:

टोमॅटो - 332 क्विंटल (800 ते 1,000), कोबी - 220 क्विंटल (400 ते 500), फ्लॉवर - 190 क्विंटल (1,000 ते 1,200), वांगी - 68 क्विंटल (2,000 ते 2,500), भेंडी - 75 क्विंटल (3,000 ते 3,500), दोडका - 48 क्विंटल (4,000 ते 4,500), कारली - 76 क्विंटल (3,000 ते 3,500) दुधीभोपळा - 52 क्विंटल (1,000 ते 1,500), काकडी - 112 क्विंटल (800 ते 1,000), फरशी - 50 क्विंटल (1,500 ते 2,000), वालवड - 74 क्विंटल (1,000 ते 1,500), ढोबळी मिरची - 156 क्विंटल (3,000 ते 3,500), चवळी - 34 क्विंटल (2,000 ते 2,500), वाटाणा - 330 क्विंटल (2,200 ते 2,400), गाजर - 170 क्विंटल (1,000 ते 1,300), गवार - 27 क्विंटल 7,000 ते 8,000), आले - 155 क्विंटल ( 3,500 ते 4,000).

Onion Potato
Pune Vegetable Market Prices: भाजीपाल्याची आवक वाढली; गवार, दुधी, काकडीसह दरात 10% घसरण

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे:-

मेथी - एकूण 17 हजार 990 जुड्या (800 ते 1,311 रुपये), कोथिंबीर - एकूण 34 हजार 350 जुड्या (800 ते 1,330 रुपये), शेपू - एकूण 3 हजार 570 जुड्या (500 ते 1,200 रुपये), पालक - एकूण 3 हजार 528 जुड्या (500 ते 800 रुपये).

Onion Potato
Pune Fish Market Prices: मासळी तेजीतच; चिकन, मटण आणि अंडी स्थिर

जनावरे:

जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 35 जर्सी गायींपैकी 28 गायीची विक्री झाली (15,000 ते 70,000 रुपये), 85 बैलांपैकी 60 बैलांची विक्री झाली (10,000 ते 40,000 रुपये), 110 म्हशींपैकी 95 म्हशींची विक्री झाली (30,000 ते 80,000 रुपये), 9,600 शेळ्यामेंढ्यापैकी 8 हजार 800 शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news