

अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, वांगी, फ्लॉवर, वाटाणा, हिरवी मिरची, टोमॅटो यांची भरपूर आवक झाली. लसणाचे भाव गडगडले, तर पालेभाज्यांच्या बाजारात पालक व मेथीची आवक वाढूनही भाव तेजीत राहिले. एकूण उलाढाल 6 कोटी 65 लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण 4 हजार 500 क्विंटल आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक 2 हजार क्विंटलने घटली. कांद्याचा कमाल भाव 1 हजार 800 रुपयांवरून 1 हजार 600 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 3 हजार क्विंटल झाली. लसणाची एकूण आवक 40 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक घटली. हिरव्या मिरचीची एकूण आवक 320 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 6 हजार 500 रुपयांपासून ते 7,500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव:
कांदा - एकूण आवक 4500 क्विंटल. भाव क्र. 1 - 1600 रुपये, भाव क्र. 2 - 1,200 रुपये, भाव क्र. 3 - 800. बटाटा - एकूण आवक - 3,000 क्विंटल. भाव क्र. 1 - 1400, भाव क्र. 2 - 1,000.
फळभाज्या: फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोसाठी मिळालेला दर:
टोमॅटो - 348 क्विंटल (800 ते 1,500 रुपये), कोबी - 235 क्विंटल (800 ते 1,200), फ्लॉवर - 222 क्विंटल (1,000 ते 1,500), वांगी - 92 क्विंटल (2 ते 3 हजार), भेंडी - 102 क्विंटल (2,500 ते 3,500), दोडका - 69 क्विंटल (4 ते 5 हजार रुपये), कारली - 72 क्विंटल ( 4 ते 5 हजार), दुधीभोपळा - 52 क्विंटल (2 ते 3 हजार), काकडी - 97 क्विंटल (2 ते 3,500 रुपये), फरशी - 62 क्विंटल (2 ते 3 हजार), वालवड - 110 क्विंटल (1 ते 2 हजार रुपये), ढोबळी मिरची - 168 क्विंटल (3 ते 4 हजार), चवळी - 52 क्विंटल (2 ते 3 हजार), वाटाणा - 507 क्विंटल (2,200 ते 2,700 रुपये), गाजर - 190 क्विंटल (1,500 ते 2 हजार), गवार - 26 क्विंटल (7 ते 9 हजार), आले - 195 क्विंटल (3,500 ते 4,500 रुपये).
पालेभाज्या: चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व मिळालेले भाव : मेथी - एकूण 33 हजार 114 जुड्या (400 ते 711 रुपये), कोथिंबीर - 57 हजार 947 जुड्या (400 ते 860 रुपये), शेपू - 7 हजार 102 जुड्या (500 ते 700), पालक - 7 हजार 534 जुड्या (400 ते 600 रुपये).
जनावरे: चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 50 जर्सी गायींपैकी 35 गायींची विक्री झाली. त्यांना 15 ते 70 हजार रुपये भाव मिळाला. 110 पैकी 70 बैलांची विक्री झाली. बैलांना 10 ते 40 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. 155 म्हशींपैकी 130 म्हशींची विक्री झाली. त्यांना 30 ते 80 हजार रुपये दर मिळाला. 12,100 शेळ्या-मेंढ्यापैकी 11 हजार 200 शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2 ते 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.