CET Cell Admission Rules: संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी सेलचे कडक नियम; पारदर्शकता बंधनकारक

कॅप फेऱ्यांनंतरच्या रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश; एजंट आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीस बळी न पडण्याचे आवाहन
Maharashtra CET
Maharashtra CET pudhari photo
Published on
Updated on

पुणे: तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरावरील तसेच कॅपच्या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर राबविण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया पारदर्शक राबविण्यात यावी, यासाठी एक नियमावली ठरवली असून, त्याचे कडक पालन करण्याचे स्पष्ट निर्देश सीईटी सेलने तंत्र शिक्षण संस्थांना दिले आहेत.

Maharashtra CET
Pune Pothole Accident: सूस-म्हाळुंगे खड्डा दुर्घटना; मृत मुलाच्या कुटुंबाला ६ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश

सीईटी सेलने दिलेल्या निर्देशानुसार, महाविद्यालयांनी माहितीपुस्तिकेतील नियम १३ नुसारच संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया राबवणे बंधनकारक आहे. ही प्रवेश प्रक्रिया सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच आणि अर्जदारांच्या गुणवत्तेनुसारच करण्यात यावी. महाविद्यालयांनी संस्थास्तरावरील प्रवेशाचे नियम, प्रक्रिया व माहितीपुस्तिका आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे.

Maharashtra CET
Pune Metro Student Pass: पुणे मेट्रोच्या विद्यार्थी पासला जोरदार प्रतिसाद; ३७ हजार ७२५ स्टुडंट कार्डचे वाटप

इच्छुक उमेदवार संबंधित महाविद्यालयात थेट अर्ज करू शकतात तसेच थेट अर्ज करणे शक्य नसल्यास उमेदवार पोर्टल लॉगिनद्वारे संस्थास्तरावरील पसंतीक्रम भरू शकतात. संस्थास्तरावरील प्रवेशासाठी प्राप्त अर्ज तसेच सीईटी सेलने उपलब्ध करून दिलेली विद्यार्थ्यांची यादी विचारात घेऊन महाविद्यालयाने अधिकृत गुणवत्ता यादी तयार करून ती नोटीस बोर्डावर व अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा संस्थास्तरावरील प्रवेश निश्चित झाल्यानंतर महाविद्यालयाने त्याची नोंद पोर्टलवर तत्काळ करणे बंधनकारक आहे.

Maharashtra CET
Changavateshwar Temple: कऱ्हा-चांबळी संगमावरचे जागृत देवस्थान; सासवडचे श्री चांगवटेश्वर मंदिर

खोट्या व दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहा

फेऱ्या पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही एजंट, मध्यस्थ किंवा संस्थास्तरावरील जागा मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींच्या आमिषाला विद्यार्थी व पालकांनी बळी पडू नये. सोशल मीडिया लिंक, एजंट किंवा खासगी समुपदेशकांमार्फत प्रसारित होणाऱ्या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहावे.

Maharashtra CET
Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांचे ११ दिवसांपासून बेमुदत उपोषण; चार जण रुग्णालयात

कोणत्याही अफवा किंवा अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये. प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती फक्त सीईटी कक्षाच्या अथवा संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच तपासावी, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news