CET 2025 Admission: तंत्रशिक्षण प्रवेशासाठी मिळणार 300 पर्याय; ‘सीईटी सेल’कडून विद्यार्थ्यांना चारही फेर्‍यांच्या प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन

विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे
Polytechnic Admission
तंत्रशिक्षण प्रवेशासाठी मिळणार 300 पर्याय File Photo
Published on
Updated on

पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये चारही कॅप फेर्‍यांची प्रवेशप्रक्रिया कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे, तसेच उमेदवार त्यांच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने संस्था आणि अभ्यासक्रमांच्या जास्तीत जास्त 300 पर्याय भरू शकणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. (Pune Latest News)

सीईटी सेलच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती पुस्तिकेतील नियम 9 मधील तरतुदीनुसार, उमेदवार त्यांच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने संस्था आणि अभ्यासक्रमांची पसंती भरू शकतात. उमेदवाराने त्यांच्या लॉगिनद्वारे अर्ज सादर केल्यानंतर पर्याय अर्ज संबंधित केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेरींमध्ये वाटपासाठी विचारात घेतला जाईल.

उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने संस्था आणि अभ्यासक्रमांच्या जास्तीत जास्त 300 पर्याय भरण्याची संधी देण्यात आली आहे.

Polytechnic Admission
Uttarakhand tourists: उत्तराखंडमध्ये अडकलेले पुणे जिल्ह्यातील पर्यटक सुखरूप

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी - 1

जर एखाद्या उमेदवाराला त्याच्या पहिल्या पसंतीनुसार जागावाटप केली गेली, तर असे वाटप आपोआप गोठवले जाईल आणि उमेदवारास दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. असा उमेदवार पुढील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेर्‍यांमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाहीत.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी - 2

जर एखाद्या उमेदवाराला दुसर्‍या फेरीत त्याच्या पहिल्या तीन पसंतींनुसार जागावाटप केले गेली, तर असे जागावाटप आपोआप गोठवले जाईल आणि उमेदवारास दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. असा उमेदवार पुढील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेर्‍यांमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाही.

Polytechnic Admission
Sanjay Gandhi Niradhar Yojana: आधार लिंक नसल्याने पुण्यातील 12,000 लाभार्थी वंचित; आधार लिंक करण्याची प्रोसेस जाणून घ्या

saकेंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी - 3

जर एखाद्या उमेदवाराला तिसर्‍या फेरीत त्याच्या पहिल्या सहा पसंतीनुसार जागावाटप केली गेली, तर असे जागावाटप आपोआप गोठवले जाईल आणि उमेदवारास दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल, असा उमेदवार पुढील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेर्‍यांमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाही.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी - 4

चौथी फेरीमध्ये सहभागी उमेदवारांसाठी चौथी फेरीमध्ये केलेले वाटप अंतिम असेल. चौथी फेरीनंतर उमेदवाराला आणखी कोणताही सुधारणा पर्याय उपलब्ध राहणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news