Pune news
Baramati NewsPudhari

Baramati News: रस्त्यात अडसर ठरणार्‍या 10 दुकानदारांवर खटले दाखल

नगरपालिकेच्या मदतीने बारामती पोलिसांची कारवाई
Published on

बारामती : पुढारी वृत्तसेवा

‘स्वतःचे दुकान मोठे असले, तरी कायद्यापेक्षा मोठे कोणीच नाही’ हे दाखवून देताना बारामती वाहतूक पोलिसांनी रस्ते अडवून व्यवसाय करणार्‍या 10 दुकानदारांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

नेवसे रोड, स्टेशन रोड आणि पाटस रोड परिसरातील काही नामांकित दुकानदारांनी रस्त्यावरच आपले दुकान मांडले होते. याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कुठे दुचाकी दुरुस्ती, कुठे स्पेअर पार्ट्सची विक्री, तर कुठे चप्पल-कपड्यांचे स्टॉल्समुळे रहदारीस अडचण होत होती. वाहनचालकांना होणार्‍या या त्रासातून वाहतूक पोलिसांनी संबंधित दुकानांवर कारवाई केली.

Pune news
Artificial Flower Ban: कृत्रिम फुलबंदी ठरणार शेतकर्‍यांसाठी 100 कोटींची भेट

या कारवाईत कपूर ऑटो स्पेअर पार्ट्स, एक्झिक्यूटिव्ह ऑटोमोबाईल्स, ज्येनुनिई स्पेअर पार्ट्स, होरा ऑटो सेंटर (नेवसे रोड), एस के शूज, कियारा लाइफस्टाईल, न्यू भारत कलेक्शन, तिवारी फॅशन, भावना फॅशन (स्टेशन रोड), आदित्य शिव मार्ट (भिगवण चौक, पाटस रोड) या दुकानांचा समावेश आहे.

या सर्व दुकानांना यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी साहित्य हटवले होते, पण ’पोलिस गेले की पुन्हा तेच खेळ’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी नगरपरिषद कर्मचार्‍यांना सोबत घेऊन कारवाईचा धडाका लावला. सर्व अडथळा ठरणारे साहित्य ताब्यात घेतले आहे. तसेच संबंधित दुकानदारांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत.

Pune news
Pune News: महापालिकेच्या ‘फ्री बेड’ सुविधेबाबत नागरिकांना माहितीची नाही!

आता या दुकानदारांना न्यायालयात हजर राहून दंडही भरावा लागणार आहे. ही कारवाई शहरातील अतिक्रमण करणार्‍यांसाठी स्पष्ट इशारा ठरत आहे. त्यामुळे कायद्याची थट्टा करणार्‍यांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच धडा शिकवल्याची चर्चा आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक सुभाष काळे, पोलिस अंमलदार प्रदीप काळे, सुधाकर जाधव, अजिंक्य कदम, रेश्मा काळे, सीमा घुले, रूपाली जमदाडे, माया निगडे, स्वाती काजळे, दत्तात्रय भोसले. आकाश कांबळे, प्रज्योज चव्हाण आणि बारामती नगरपालिकेचे सागर भोसले, संदीप किर्वे, शंकर सोनवणे, श्रीकांत सूर्यवंशी यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news