पुणे : लाच प्रकरणी वडगाव निंबाळकरला पोलिसाविरोधात गुन्हा

file photo
file photo

बारामती : पुढारी वृत्तसेवा

मानव मिसिंगच्या दाखल गुन्ह्यात ताब्यात घेतलेले दोन मोबाईल फोन परत करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस नाईक बाळासाहेब पंढरीनाथ पानसरे (वय ४०) यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची पडताळणी १९ मे रोजी करण्यात आली. तक्रारदार यांच्या गावातील व्यक्ति मिसिंग होती. त्यासंबंधी चौकशीसाठी बाळासाहेब पानसरे यांनी तक्रारदाराचे दोन मोबाईल फोन ताब्यात घेतले होते. ते परत करण्यासाठी त्यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

पडताळणीअंती त्यात तथ्य आढळल्याने पानसरे यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधीनियमानुसार गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भारत साळुंखे अधिक तपास करत आहेत. शासकिय अधिकारी, कर्मचारी, लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news