सांगवी, पिंपरीतून गांजा जप्त; पाच जणांना अटक

Pimpri: 24 kg cannabis seized from Otaskim
Pimpri: 24 kg cannabis seized from Otaskim
Published on
Updated on

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गांजा बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सांगवी आणि पिंपरी परिसरात ही कारवाई केली.

पहिल्या कारवाईत सुनील शिवाजी शितोळे (34, रा. जुनी सांगवी), असिफ बहादुरशाह सय्यद (44, रा. काटेपुरम चौक, सांगवी), महेश मलेश रावलल्लू (42, रा. जुनी सांगवी) यांना ताब्यात घेतले.

त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीचा 40 ग्रॅम गांजा आणि 35 रुपयांचे गांजा ओढण्याचे साहित्य जप्त केले. आरोपी पवना नदीच्या काठावर दशक्रिया विधी घाट येथे गांजा ओढत होते.

याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून तिघांना अटक केली. दुसर्‍या कारवाईत यश सर्जेराव खवळे (19, रा. भाटनगर झोपडपट्टी, पिंपरी), मिनाज अजीज आलम (26, रा. काळेवाडी स्मशानभूमीजवळ) या दोघांना अटक कऱण्यात आली घेतले.

त्यांच्याकडून 10 ग्रॅम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य असा एकूण 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपी भाटनगर येथे गांजा ओढत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधात पथकाला मिळाली. त्यानुसार कारवाई करीत दोघांना अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news