पिंपरी: डीपीयू रुग्णालयात वृद्धाच्या कर्करोगावर यशस्वी उपचार

पिंपरी: डीपीयू रुग्णालयात वृद्धाच्या कर्करोगावर यशस्वी उपचार
Published on
Updated on

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपरी येथील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये 65 वर्षीय वृद्धाला झालेल्या यकृताच्या कर्करोगावर यशस्वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहे. त्यांना यकृतावर दोन मोठ्या गाठी झाल्या होत्या. त्यातील सर्वाधिक मोठी गाठ 10.5 सेंटिमीटरची होती. या गाठी आता उपचारानंतर नियंत्रणात आल्या आहेत.

कोईम्बतूर येथील 65 वर्षीय रुग्ण महादेव (रुग्णाचे नाव बदलले आहे) यांना यकृताच्या कर्करोग (हेपॅटोसेल्युलरकार्सिनोमा) झाला होता. त्यांना सप्टेंबर 2022 मध्ये प्रथमच रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला अनुक्रमे 10.5 सेंटीमीटर आणि 4.5 सेंटीमीटर अशा दोन कर्करोगाच्या गाठी होत्या.

रुग्णावर डीसीबीड्ससह टीएसीई (ट्रान्सार्टेरियल केमोइम्बोलायझेशन) नावाचा उपचार करण्यात आला. ही एक कमीतकमी घातक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कोणत्याही चिरेची आवश्यकता नसते. या प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या मांडीच्या रक्तवाहिनीद्वारे यकृताच्या गाठीला रक्तपुरवठा करणारी धमणी अवरोधित करण्यात आली. अखेरीस, या प्रक्रियेद्वारे कर्करोगाच्या पेशींचा र्‍हास झाला आणि गाठी लहान होऊ लागल्या. या प्रकरणात रुग्णाला टीएसीई उपचारांची 4 सत्रे दिली गेली. सुरुवातीच्या उपचारानंतर रुग्ण सुधारण्याची चिन्हे दिसू लागली.

डॉ. अरकर म्हणाले, 'आमच्यासाठी हे एक अनोखे प्रकरण होते. कारण रुग्ण 6 महिनेच जगेल असे सांगण्यात आले होते. आम्ही रोगाची गुंतागुंत समजून घेतली आणि छोटी पण स्थिर पावले टाकून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय प्रगती आणि रुग्णालयातील आरोग्य सुविधांमुळे आम्हाला उपचार करणे सुलभ झाले.'

यकृत प्रत्यारोपण सर्जन आणि वरिष्ठ सल्लागार (एचपीबी) डॉ. मनोज डोंगरे, रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा करमरकर यांनीही रुग्णावर केलेल्या उपचारांची माहिती दिली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील म्हणाले, 'की एका रुग्णाचा जीव वाचविल्याबद्दल उपचार करणार्‍या डॉक्टरांचे मी मनापासून अभिनंदन करतो. रुग्ण निरोगी आणि चांगल्या स्थितीत हॉस्पिटलमधून बाहेर पडणे ही आमच्यासाठी ऐतिहासिक कामगिरी आहे.'

डीपीयू सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे सहाय्यक प्राध्यापक (इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी विभाग) डॉ. संभाजी पवळ, सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल अरकर यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. ही प्रक्रिया रुग्णाला भूल न देता पार पडली. वेदना, भूक न लागणे, थकवा आणि वजन कमी यांसारख्या त्याच्या कर्करोगाशी संबंधित लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

आम्ही डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये रुग्णांची सुरक्षा आणि त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. रुग्ण केवळ 6 महिने जगू शकतो, असे जेव्हा इतर तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले होते, अशा परिस्थितीत रुग्ण आमच्याकडे उपचारासाठी आला होता. त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचले.
– डॉ. भाग्यश्रीताई पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news