Cabbage Rates: कोबीचा दर 20 वरून थेट 60 रुपयांवर, काय आहे कारण?

बाजारात तरकारीची आवक कमी; अतिवृष्टीचा परिणाम
Cabbage Farmers Crisis
मंचरला कोबीचा दर 20 वरून थेट 60 रुपयांवरPudhari
Published on
Updated on

मंचर: कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे कोबीला गेल्या आठवड्यात 20 ते 50 रुपये दर मिळाला होता. तो रविवारी (दि. 28) थेट 60 ते 181 रुपयांवर पोहचला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे रविवारी तरकारी शेतमालाची एकूण 5037 डाग इतकी आवक झाली. अतिवृष्टीमुळे मागील आठवड्यापेक्षा 60 टक्केने तरकारीची आवक घटली.

त्यामुळे तरकारीच्या बाजारभावात थोडी वाढ झाली. त्यातून कोबी या शेतमालाला प्रतवारीनुसार दहा किलोला 60 ते 181 रुपये असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात कोबीचे बाजारभाव 20 ते 50 रुपये असे होते. याबाबत बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी माहिती दिली. (Latest Pune News)

Cabbage Farmers Crisis
Tehsildar crop loss visit: शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले तहसीलदार; डिंगोरे, पिंपळगाव जोगामधील नुकसानीची पाहणी

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारची तरकारी आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर, शिरूर या भागातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी तरकारी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. येथे शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर वजन, बाजारभाव व एकूण रक्कम याचा एसएमएस मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना कळवला जातो. रविवारी आवक झालेल्या सर्व तरकारी शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाल्याचे बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.

Cabbage Farmers Crisis
Illegal flex Pune: अनधिकृत फ्लेक्स हटविले; नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई

मंचर बाजार समितीमध्ये तरकारीला दहा किलोचा दर पुढीलप्रमाणे.

कोबी- (381) 60-181, कारले (139) 130-250, गवार (144) 700-1201, घेवडा (78) 150-700, चवळी (177) 330-615, ढोबळी मिरची (107) 325-600, भेंडी (166) 100-500, फरशी (126) 150-460, फ्लॉवर (527) 50-225, भूईमुग शेंगा (3)400, दोडका (43) 225-400, मिरची (207) 270-521, तोंडली (1)351, लिंबू (3) 400, काकडी (777) 80-160, वांगी (57) 295-550, दुधी भोपळा (77) 130-300

बीट (978) 100-290, आले (29) 150-500, टोमॅटो (93) 190-360, मका (296) 50-150, पावटा (14) 250-450, वालवड (62) 500-751, राजमा (65) 275-500, शेवगा (45) 375-600, पापडी (39)450-751, आंघोरा (3) 100, वाटाणा (12) 850-1000, डांगर भोपळा (69) 40-120, गाजर (50) 30-150, सीताफळ (21) 100-250, बटाटा (110) 50-160, रताळे (10) 100-300, घोसाळी (5) 100-200.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news