पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार्टर्ड अकाउंटंट्स अर्थात सीएच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाद्वारे घेण्यात येणार्या परीक्षांबाबत ही याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षांच्या तारखा बदलण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. निवडणुकीच्या दिवसांमध्ये परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना प्रवासातील अडचणी, मतदान केंद्रांजवळ जास्त गर्दी आणि सुरक्षा समस्या, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असे याचिकाकर्त्याने म्हटले होते.