खेड-शिवापूर टोलनाक्यावर मनुस्मृती दहन; केसरकर यांच्या पुतळ्याला जोडे मारले

खेड-शिवापूर टोलनाक्यावर मनुस्मृती दहन; केसरकर यांच्या पुतळ्याला जोडे मारले

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : भविष्यात शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश व्हावा, यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. याला विरोध करण्यासाठी भोर, वेल्हे आणि हवेली तालुक्यातील रिपाइं (आठवले गट) च्या वतीने खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत मनुस्मृतीचे दहन करून निषेध करण्यात आला.

माणुसमृती अन्यायकारक..

मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना शिक्षण द्यायचे नाही, सती जाणे अशा एक ना अनेक गोष्टी नमूद आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1927 मध्ये विरोध करून मनुस्मृती दहन केली होती. आता हे सरकार यातील काही श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा घाट घालत असल्याने हे आंदोलन करण्यात आले.

'जातीयवादी सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय', 'मनुवादी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय', शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा धिक्कार असो, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. मनुस्मृती एक शाप आहे, तो कदापिही आम्ही स्वीकारणार नाही असे आपल्या कवितेमधून जयवंत सोनवणे यांनी बोलून दाखविले.

केसरकरांविरुद्ध आक्रोश!

आंदोलनाच्या शेवटी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. जर मनुस्मृती विषय अभ्यासक्रमात आला तर देशभर याचे वाईट परिणाम पाहायला मिळतील, असा इशारा रिपाइंचे युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण ओव्हाळ यांनी दिला. विधानसभेला आंबेडकरी जनतेने महायुतीला मतदान करणार नसल्याचे या वेळी घोषित केले.

या आंदोलनात प्रवीण ओव्हाळ, महेंद्र साळुंखे, किशोर अमोलिक, नवनाथ कदम, सागर जगताप, विनोद गायकवाड, राजेश कासारे, पप्पू कांबळे, आकाश कांबळे, अभिषेक वैराट, शीतल कांबळे, मुन्ना गायकवाड, अमोल गायकवाड, तुषार कांबळे, बाळासाहेब साळवे, नेहाल तांगडे, संतोष साळवे, संदीप कांबळे, दादा शेलार, संतोष जाधव, अरुण रणखांबे, आनंद खुडे, शेखर ओव्हाळ, किरण यादव तसेच भोर, वेल्हे आणि हवेलीतील रिपाइं कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या वेळी राजगडचे पोलिस उपनिरीक्षक दाजी देठे, फौजदार अंबादास बुरटे, सुधीर खडतरे, पोलिस हवालदार अजित माने, भगीरथ घुले, मुकुल गायकवाड, अमित कांबळे, राहुल कोल्हे तसेच महिला पोलिस यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news