Breaking : मेफेड्रोन तस्करी प्रकरणी ‘त्या’ फौजदाराला अटक : ४५ कोटींचे मेफेड्रोन जप्त

Breaking : मेफेड्रोन तस्करी प्रकरणी ‘त्या’ फौजदाराला अटक : ४५ कोटींचे मेफेड्रोन जप्त
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्री प्रकरणी हॉटेल कामगाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली . मात्र, या कामगाराच्या संपर्कातील पोलीस फौजदाराचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. दरम्यान, शुक्रवारी (दि. १) रात्री उशिरा फौजदाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह दोन कर्मचारी देखील अडचणीत आले आहेत. त्यांच्याकडून सुमारे ४५ कोटी रुपयांचे ४५ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या कारवाईमुळे पोलीस दलासह राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. विकास शेळके (नेमणूक- निगडी पोलिस ठाणे), असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी नमामी शंकर झा (३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) याला सुरुवातीला अटक केकरण्यात आली होती. पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकजण विशालनगर परिसरात मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर सांगवी पोलिसांनी सापळा रचून नमामी शंकर झा याला दोन किलो मेफेड्रोनसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत उपनिरीक्षक विकास शेळके यांनी हे ड्रग्स त्याच्याकडे दिल्याचे समोर आले. त्यानंतर विकास शेळके यांच्या ताब्यातून सुमारे ४५ किलो ड्रग्स जप्त करण्यात आले. अशाप्रकारे एकूण ४५ कोटी रुपये किंमत असलेले ४५ किलो मेफेड्रोन आत्तापर्यंत जप्त करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत चौकशी सुरू असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news