रक्त अदलाबदली प्रकरण : अखेर ‘त्या’ दोन परिचारिका निलंबित

रक्त अदलाबदली प्रकरण : अखेर ‘त्या’ दोन परिचारिका निलंबित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : औंध जिल्हा रुग्णालयात परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे रक्ताची अदलाबदल झाली आणि एकच खळबळ उडाली. संबंधित प्रकरणाची मंगळवारी (दि.26) गांभीर्याने दखल घेण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दोन्ही अधिपरिचारिकांना निलंबित केले. प्रीती ठोकळ आणि शांता मकलूर अशी त्यांची नावे आहेत. न्यूमोनिया झाल्याने रुग्ण दत्तू सोनाजी सोनवणे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्याचवेळी त्यांच्या बाजूच्या बेडवर दगडू कांबळे दाखल झाले. ज्येष्ठ नागरिक असलेल्या दोन्ही रुग्णांना रक्त देण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या. त्यानुसार दोन्ही रुग्णांच्या नावाच्या रक्तपिशव्या वॉर्डमध्ये पाठविण्यात आल्या.

मात्र, परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे रक्तपिशव्यांची अदलाबदली झाली. रुग्णांना काही काळाने त्रास सुरू झाला. त्यामुळे नातेवाइकांनी तक्रार केल्यावर संबंधित प्रकार लक्षात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यमपल्ले यांनी चौकशी करून अहवाल मागविला. संपूर्ण अहवाल पाहिल्यानंतर मंगळवारी (दि. 26 मार्च) दोन अधिपरिचारिकांना तडकाफडकी निलंबित केले. सध्या दोन्ही रुग्णांची परिस्थिती स्थिर असल्याचे समजते.

अधिपरिचारिकांकडून झालेली चूक गंभीर स्वरूपाची आहे. दोन्ही रुग्णांना 72 तास देखरेखीखाली ठेवण्यात आले. दोघांबाबतीत सुदैवाने गंभीर रिअ‍ॅक्शन झाली नाही. चांगल्या प्रतिकार शक्तीमुळे गंभीर त्रास झाला नाही. रुग्णांना आणखी काही काळ देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

– डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news