Smitatai Jadhav: पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिताताई जाधव यांचा इंदापूरमध्ये प्रचार

गावोगावी पदवीधर मतदारांशी संपर्क मोहीम; रोजगार, युवकांचे प्रश्न आणि महिला सक्षमीकरणावर भाजपचा भर
Smita jadhav
Smita jadhavPudhari
Published on: 
Updated on: 

इंदापूर: पुणे पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांच्या प्रचाराने इंदापूर तालुक्यात वेग घेतला असून, गावोगावी पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपच्या वतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. पदवीधरांचे प्रश्न, युवकांच्या समस्या आणि उच्चशिक्षितांच्या अपेक्षांना न्याय देण्याच्या मुद्द्यावर भाजपकडून मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे, अशी माहिती इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व भाजप नेते मयूरसिंह पाटील यांनी दिली.

Smita jadhav
Pune Vegetable Market Rates: पुण्यात नवरात्रोत्सवामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले; भेंडी, मिरची, शेवगा महागले

पुणे पदवीधर मतदारसंघाला शैक्षणिक आणि बौद्धिक परंपरेचा वारसा लाभला आहे. या मतदारसंघातील पदवीधर मतदार सुशिक्षित असून, रोजगार, युवकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि पदवीधरांच्या विविध समस्यांबाबत त्यांच्या अपेक्षा आहेत. या प्रश्नांची प्रभावी मांडणी करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Smita jadhav
Pune Market Rates: पुण्यात डाळी महागल्या; साखर, गुळाच्या दरातही वाढ

डॉ. स्मिताताई जाधव या पीएच.डी. असून, डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून कार्यरत असल्याचे सांगत, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि पदवीधरांच्या प्रश्नांचा अभ्यास असल्याचे पाटील यांनी नमूद केले. युवकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि पदवीधरांच्या अडचणी यांवर काम करण्यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

Smita jadhav
Pune Fish Market Rates: पुण्यात पापलेट महागले; बांगडा, कोळंबीसह अन्य मासळीचे दर स्थिर

पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार

पदवीधरांचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा सन्मान राखणे, रोजगाराच्या संधी, युवकांच्या समस्या आणि उच्चशिक्षितांच्या अपेक्षांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. या विषयांवर डॉ. स्मिताताई जाधव यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Smita jadhav
Pune Ice Ball Falls: पुण्यात कडक उन्हात आकाशातून कोसळला २० किलोचा बर्फाचा गोळा! शेतकरी थक्क; घटनेचे गूढ कायम

इंदापूर तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावोगावी प्रचार सुरू असून, अधिकाधिक पदवीधर मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. पक्षाच्या वतीने व्यापक संपर्क मोहीम राबवून उमेदवाराच्या पाठीशी मतदारांचे पाठबळ उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मयूरसिंह पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news