Pune BJ Medical Student Missing: बी.जे. मेडिकलचा विद्यार्थी १४ दिवसांपासून बेपत्ता; रॅगिंगचा आरोप, महाविद्यालयाचा नकार

एमबीबीएस प्रथम वर्षाचा तन्मय वंगे हॉस्टेल सोडल्यानंतर बेपत्ता; वडिलांचा मानसिक छळाचा आरोप, चौकशीत रॅगिंगचा पुरावा नसल्याचा महाविद्यालयाचा दावा
Student Missing
Student MissingPudhari
Published on
Updated on

पुणे: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेला तन्मय वंगे हा विद्यार्थी गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रॅगिंगच्या सततच्या त्रासाला कंटाळूनच त्याने हॉस्टेल सोडल्याचा आरोप त्याचे वडील अजयकुमार वंगे यांनी केला आहे. दरम्यान, हे प्रकरण रॅगिंगचे नसून महाविद्यालयाकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीत कोणताही विद्यार्थी याप्रकरणी दोषी आढळून आला नाही, असा खुलासा महाविद्यालया कडून करण्यात आला आहे.

Student Missing
Pune Flood: खडकवासला धरणातून ४३ हजार क्युसेक विसर्ग; पुण्यात नदीकाठच्या भागांना पुराचा धोका कायम

बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून काही विद्यार्थ्यांकडून तन्मयला सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. या छळाला कंटाळूनच १८ जुलै रोजी तन्मय नातेवाइकांकडे जात असल्याचे सांगून हॉस्टेलमधून बाहेर पडला असल्याचा आरोप अजयकुमार वंगे यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी पोलिस आणि महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.

Student Missing
Pune Ekta Nagar Flood Rehabilitation: एकतानगर पूरमुक्तीसाठी पुनर्वसनाचा पर्याय; क्लस्टर डेव्हलपमेंट प्रस्तावावर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये तन्मय सोलापूरकडे जाणार्‍या रेल्वेत चढताना दिसला. मात्र, लोणीकंद रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मोबाईल बंद झाला आणि त्यानंतर त्याचा कोणताही मागमूस लागलेला नाही. २१ ते २३ जुलैदरम्यान तन्मयच्या मोबाईलवर काही काळ इंटरनेट सुरू झाल्याचे तपासातून समोर आले. मात्र, त्यानंतर त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.

Student Missing
Pune School Mid Day Meal Rice Supply: पुणे जिल्ह्यात शालेय पोषण आहार संकटात; जूनपासून तांदूळ नाही, ७.४० लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर

... हे रॅगिंगचे प्रकरण नाही

चौकशीमध्ये एकही विद्यार्थी दोषी आढळला नाही महाविद्यालयाचे स्पष्टीकरण हा विद्यार्थी १८ जुलै रोजी बी.जे. महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून बाहेर पडल्याचे सीसीटीव्ह फुटेजमध्ये दिसत आहे. काकांकडे निघाल्याचे सांगून हा विद्यार्थी हॉस्टेलमधून बाहेर पडला. त्यानंतर तो खराडी येथील मित्राकडे गेला होता. तेथून तो काकांकडे चाललो म्हणून निघाला. त्यानंतर तो बेपत्ता आहे. हा विद्यार्थी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी प्रथम पोलिसांत तक्रार दिली होती. बेपत्ता झाल्यानंतर १० दिवसांनी २७ जुलै रोजी त्याच्या वडिलांनी माझ्याकडे पहिल्यांदा याप्रकरणी तक्रार केली. महाविद्यालयाने चार सदस्यीय चौकशी समिती नेमूण या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये कोणताही विद्यार्थी दोषी आढळून आलेला नाही. त्यामुळे हे रॅगिंगचे प्रकरण नाही, अशी माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.

Student Missing
Pune Khadakwasla Dam Water Release: खडकवासला धरणातून विसर्ग वाढला; पुण्यात नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली, वाहतूक बंद

हे रॅगिंगचे प्रकरण नाही. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या चौकशीमध्ये एकही विद्यार्थी याप्रकरणी दोषी आढळून आलेला नाही. महाविद्यालयाने बंडगार्डन पोलिस स्टेशन आणि पोलिस आयुक्तांना याप्रकरणी पत्र पाठवले आहे.

डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्‍णालय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news