Bibwewadi Issues PMC Election: बिबवेवाडीच्या विकासाला ब्रेकच का?

प्रभाग 39 मधील रखडलेली कामे, पाणीपुरवठा-ड्रेनेज आणि वाहतूक कोंडीवर नागरिकांचा सवाल
Bibwewadi Issues PMC Election
Bibwewadi Issues PMC ElectionPudhari
Published on
Updated on

प्रभाग क्रमांक 39 मधील नागरिकांना आजही पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या दुरवस्थेसह विविध समस्यांचा समाना करावा लागत आहे. अप्पर सुपर आणि इंदिरानगर परिसराचा विकास झाला असला, तरी खडकेवस्ती, शेळकेवस्ती, श्रेयसनगर, पद्मावतीनगर, शिवतेजनगर, अंबिकानगर, सरगम चाळ आदी भाग आजही विकासापासून वंचित आहे. काकडेवस्ती चौक ते शेळकेवस्ती दरम्यानच्या रस्त्याचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडले आहे. प्रभागातील उद्यानाची दुरवस्था झाली असून, मुलांना खेळण्यासाठी अद्याप एकही क्रीडांगण नाही.

Bibwewadi Issues PMC Election
Leopard Capture: पिंपरखेडमध्ये बिबट्या जेरबंद; शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा

प्रभाग क्रमांक : 39 अप्पर-सुपर-इंदिरानगर

रघुनाथ कसबे

या प्रभागात झोपडपट्ट्यांचा भाग मोठा असून, परिसरात गेली दहा वर्षांपासून ड्रेनेज लाइनची दुरवस्था झाली आहे. खड्डे पडल्यामुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात ठिकठिकाणी कचरा साचत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. अप्पर डेपो, इंदिरानगर चौक आणि विश्वकर्मा महाविद्यालयाजवळील संविधान चौक परिसरात ड्रेनेज लाइन तुंबत असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे. रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत आहे.

Bibwewadi Issues PMC Election
Tomato Prices: नारायणगावमध्ये टोमॅटोचे दर चढले; उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची चिंता

पासलकर चौक ते फाशी गेट चौक आणि अप्पर डेपो ते इंदिरानगर चौकादरम्यान सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणांमुळे रस्ते वाहतुकीसाठी अरुंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काकडेवस्ती चौक ते शेळकेवस्ती दरम्यानच्या रस्त्याचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडल्याने नागरिकांचा प्रवास खडतर झाला आहे. अप्पर पीएमपी डेपो ते चैत्रबन वसाहत परिसरातील अनधिकृत पथारी व्यावसायिक आणि भाजी विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये तत्कालीन नगरसेवकांना प्रभागातील विविध समस्या सोडविण्यास अपयश आहे. या समस्या सुटणार तरी कधी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Bibwewadi Issues PMC Election
PMC Election: दिग्गजांचे डिपॉझिट जप्त करणारा ‘तो’ विजय! संजय बालगुडे यांची निवडणूकगाथा पुन्हा उलगडली

लेकटाऊन सोसायटी परिसरात सीमाभिंतीचे काम रखडले आहे. ठिकठिकाणी सांडपाणी वाहत आहे. हुजूरपागा विद्यालय ते डाके चौक, हिरामण बनकर विद्यालयादरम्यान वाहतूक कोंडी होत आहे. बनकर विद्यालयाजवळील ओढ्याच्या साफसफाईच्या कामाकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महावीर उद्यानासमोरील पार्किंग व कचरा रिसायकलिंग पॉईंटमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महालक्ष्मी सोसायटी, लेक टाऊन भागातील ॲमिनेटी स्पेसचा अद्यापही विकास झाला नाही. प्रभागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Bibwewadi Issues PMC Election
PMC Election: प्रभाग 37 मध्ये चौरंगी लढत निश्चित! फुटलेल्या पक्षांनी बदलले संपूर्ण राजकीय गणित

प्रभागात या भागांचा समावेश

अप्पर सुपर, इंदिरानगर, खडकेवस्ती, काकडेवस्ती, शेळकेवस्ती, श्रेयसनगर, पद्मावतीनगर, शिवतेजनगर, अंबिकानगर, सरगम चाळ, वर्धमान सांस्कृतिक भवन परिसर, विश्वकर्मा महाविद्यालय परिसर, सुखसागरनगरमधील राजस सोसायटीचा काही भाग, लेकटाऊन परिसर, के. के. मार्केट परिसरातील बालाजीनगरचा काही भाग.

Bibwewadi Issues PMC Election
PMC Election: धनकवडीतील रस्ते ‘जॅम’! अतिक्रमण, अरुंद रस्ते आणि रखडलेली कामे नागरिकांच्या नाकी नऊ

प्रभागातील प्रमुख समस्या

मुलांना खेळण्यासाठी प्रभागात क्रीडांगणाचा अभाव

प्रभागातील चारपैकी तीन उद्यानांची झालेली दुरवस्था

लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या आरोग्य सेवेचा अभाव

काकडेवस्ती ते शेळकेवस्तीदरम्यान रखडलेल्या रस्त्याची झालेली दुरवस्था

बिलाल मशिद, सरगम चाळ, पद्मावतीनगर, खडकेवस्ती, अंबिकानगर, शिवतेजनगर भागात ड्रेनेजची झालेली दुरवस्था

अप्पर-सुपर भागात वारंवार विस्कळीत होणारा पाणीपुरवठा

वारंवार दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

रस्त्यांवर ठिकठिकाणी वारंवार साचत असलेले कचऱ्याचे ढीग

माननीयांनी द्यावीत या प्रश्नांची उत्तरे

महेश सोसायटी चौक ते पासलकर चौकादरम्यान अतिक्रमणे का वाढली?

अप्पर डेपो परिसरातील भाजी विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप का सुटला नाही?

प्रभागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना का झाल्या नाहीत?

अप्पर भागातील अनधिकृत बांधकामे आणि गोडाऊनाकडे दुर्लक्ष का?

प्रभागातील ड्रेनेज लाइन, कचऱ्याचा प्रश्न कधी सुटणार?

Bibwewadi Issues PMC Election
Marathi Sahitya Sammelan: साहित्य संमेलनाच्या कवी कट्ट्यासाठी कवितांचा वर्षाव!

प्रभागात झालेली प्रमुख कामे

युगपुरुष राजा शिवछत्रपती रुग्णालय

सुपर येथील खिंडीतील रस्त्याचे रुंदीकरण

आरोग्यवर्धिनी दवाखान्याची उपलब्धता

बिबवेवाडी स्मशानभूमीत ‌‘एअर पोल्युशन सिस्टिम‌’

दुर्गामाता उद्यानात बालकांसाठी खेळणीची उपलब्धता

हिंदू सुपर मार्केट परिसरात सांस्कृतिक भवन उभारले

जीर्ण झालेल्या जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइन बदलल्या

Bibwewadi Issues PMC Election
Yerwada Garbage Issue: येरवड्यात कचऱ्याचा खच; दुकानदार त्रस्त!

ओटा परिसरातील 276 चाळीमधील नागरिकांच्या घरात पावसाळ्यात पाणी शिरत आहे. परिसरातील नाल्यांना कचऱ्याचा विळखा पडला आहे. अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महेश सोसायटी परिसरातील रस्त्यावर अतिक्रमणे वाढल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

स्नेहा परदेशी, रहिवासी

सुपर परिसरात महापालिकेच्या माध्यमातून युगपुरुष राजा शिवछत्रपती रुग्णालय उभारले आहे. हिंद सुपर मार्केटजवळ सांस्कृतिक केंद्र उभारले आहे. अप्पर ओटा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण केले आहे. अप्पर सुपर भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण केले आहे. प्रभागात अनेक विद्युतवाहिन्या भूमिगत केल्या आहेत. बिबवेवाडी स्मशानभूमीमध्ये ‌’एअर पोल्युशन सिस्टीम‌’ बसवली आहे.

रूपाली धाडवे, माजी नगरसेविका

अप्पर ओटा परिसरात प्रेमचंद ओसवाल रुग्णालय उभारले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय ई-लर्निंग स्कूल सुरू केले आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विरंगुळा केंद्र, बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन उभारले आहे. अप्पर चैत्रबन चौकातील विविध महापुरुषांचे पुतळे आणि चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. झोपडपट्टीमध्ये नव्याने ड्रेनेज लाइन आणि जलवाहिन्या टाकल्या आहेत.

बाळा ओसवाल, माजी नगरसेवक

प्रभागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. जीर्ण झालेल्या ड्रेनेज लाइन बदलून मोठ्या व्यासाच्या नवीन वाहिन्या टाकण्यात आला आहेत. सुवर्ण युग मित्रमंडळ चौकाचे सुशोभीकरणाचे काम केले आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विरंगुळा केंद्राचे काम मार्गी लावले आहे. धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण केले आहे.

वर्षा साठे, माजी नगरसेविका

माजी नगरसेवकांनी प्रभागात आपल्या फायद्यांसाठी अनेक कामे चुकीच्या पद्धतीने केल्याने अप्पर सुपर व इंदिरानगर भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिलाल मशिद, सरगम चाळ या भागात ड्रेनेज आणि रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. विश्वकर्मा विद्यालयाच्या पाठीमागे विनाकारण लोखंडी पूल उभारला आहे. अंबिकानगर, श्रेयसनगर, पद्मावतीनगर, सरगम चाळ भागातील ड्रेनेज लाइनची दुरवस्था झाली.

पूनम वाघमारे, रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news