Bhor Butterfly Species: निरा नदीकाठच्या मळा परिसरात फुलपाखरांच्या तब्बल ७१ प्रजातींची नोंद

रुई, एरंड, कढीपत्ता, लिंबूवर्गीय वनस्पतींमुळे पोषक अधिवास; स्थानिक खाद्य वनस्पतींच्या संरक्षणाची गरज
Butterfly
ButterflyPudhari
Published on: 
Updated on: 

भोर: भोर शहरातील भेलकेवाडीची हद्द संपल्यानंतर सुरू होणाऱ्या निरा नदीकाठच्या मळा परिसरात सप्टेंबर महिन्यात फुलपाखरांच्या तब्बल ७१ प्रजातींची नोंद झाली आहे. शिक्षक आणि फुलपाखरू अभ्यासक संतोष दळवी यांनी निरीक्षणासाठी या परिसराची निवड केली होती. या निरीक्षणातील सर्व नोंदी iNaturalist संकेतस्थळावर करण्यात आल्या आहेत.

Butterfly
Malegaon Development Plan: माळेगावच्या विकास आराखड्यात बाह्य रस्त्यांचा मुद्दा; हजारो एकर शेती बाधित होण्याची भीती

नोंद झालेल्या प्रजातींमध्ये प्लेन टायगर, ब्लू टायगर, कॉमन मॉर्मन, इंडियन ब्लू मॉर्मन, अँगल्ड कॅस्टर, कॉमन कॅस्टर, कॉमन ग्रास येलो आणि ग्रास डेमन यांचा समावेश आहे. या फुलपाखरांच्या अळ्यांसाठी वेगवेगळ्या खाद्य वनस्पती आवश्यक असतात. प्लेन टायगरसाठी रुई, कॅस्टर फुलपाखरांसाठी एरंड, मॉर्मनसाठी कढीपत्ता व लिंबूवर्गीय वनस्पती, तर ग्रास डेमनसाठी हळदीसारख्या वनस्पती उपयुक्त आहेत. त्यामुळे या परिसरातील वनस्पतींची विविधता फुलपाखरांसाठी पोषक अधिवास निर्माण करीत असल्याचे दिसून येते.

Butterfly
Fursungi Uruli Devachi Municipal Council: फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील २८ नगरसेवकांवर बनावट कागदपत्रांचे आरोप; चौकशीचे आदेश

प्रौढ फुलपाखरे खैरासारख्या झाडांच्या फुलांवर मधुरस घेताना दिसतात. टंटनीच्या फुलांकडेही अनेक फुलपाखरे आकर्षित होतात. मात्र, टंटनी ही आक्रमक वनस्पती असल्याने तिचा वाढता प्रसार स्थानिक वनस्पतींसाठी चिंतेचा विषय आहे. तसेच परदेशी शोभेचे फुलझाड असलेल्या डेलियाकडेही अनेक फुलपाखरे आकर्षित होत असल्याचे निरीक्षणात आले. त्यामुळे मधुरस देणाऱ्या वनस्पतींचा वापर आणि स्थानिक वनस्पतींचे संरक्षण, यामध्ये समतोल साधणे आवश्यक असल्याचे या निरीक्षणातून स्पष्ट होते.

Butterfly
Khed RTE Admission Fraud: आरटीई प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे; खेडमध्ये १४ पालकांवर गुन्हा

गावाजवळ मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रुईची पाने तोडली जात असल्याचेही निदर्शनास आले. रुईची पाने प्लेन टायगरच्या अळ्यांचे खाद्य असल्याने त्यांची तोड झाल्यास या फुलपाखरांच्या पुढील पिढ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फुलपाखरांच्या अधिवासासाठी रुईसह स्थानिक खाद्य वनस्पतींचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

Butterfly
Someshwar Election: सोमेश्वर कारखाना निवडणुकीला धक्कादायक वळण; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, विद्यमान अध्यक्ष भाजपच्या गळाला

निरा नदीकाठच्या मळा परिसरात फुलपाखरे, त्यांच्या अळ्यांच्या खाद्य वनस्पती आणि मधुरस देणारी फुले यांच्यातील परस्परसंबंध, या निरीक्षणातून समोर आला आहे. ७१ प्रजातींच्या नोंदीबरोबरच हा संपूर्ण अधिवास जपण्याची गरजही अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news