Bhor Nagarparishad Election Results: भोर नगरपालिकेत भाजपची सत्ता, राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष; विकासावर परिणाम होणार का?

क्रॉस व्होटिंगमुळे चित्र पालटले; भाजप-राष्ट्रवादी समन्वयाची शहरवासीयांची अपेक्षा
Bhor Nagarparishad
Bhor NagarparishadPudhari
Published on
Updated on

अर्जुन खोपडे

भोर: भोर नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे रामचंद्र आवारे हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले असले तरी सत्ता मात्र, भाजप पक्षाची आली आहे. आगामी काळात यामुळे दोन पक्षांची दोन तोंडे निरनिराळ्या दिशेला झाल्यास भोर शहरातील विकासाला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी एकत्र यावे, ही जनतेची अपेक्षा आहे. भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेले क्रॉस वोटिंग आणि आवारे यांच्या वैयक्तिक जनसंपर्कामुळे नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करूनही निसटता विजय मिळवत नगराध्यक्षपद मिळवले आहे; मात्र 20 पैकी 16 जागा जिंकून एकहाती सत्ता आणूनही भाजपची अवस्था ‌’गड आला पण सिंह गेला‌’ अशी झाली आहे.

Bhor Nagarparishad
MGNREGA Well Subsidy Delay: दौंड तालुक्यात मनरेगा विहिरींचे कुशल अनुदान रखडले; शेतकरी कर्जाच्या विळख्यात

मागील पंचवार्षिक निवडणुकीत रामचंद्र आवारे यांच्या पत्नी निर्मला आवारे काँग््रेास पक्षाकडून नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. काही अंतर्गत वादामुळे निवडणुकीपूर्वीच रामचंद्र आवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रवेश केला होता आणि नगराध्यक्षांची उमेदवारी जाहीर झाली होती. आवारे यांचा शहरातील नागरिकांशी असलेला वैयक्तिक जनसंपर्क आणि गोरगरीब लोकांसाठी राबवत असलेली पेन्शन योजना याचा फायदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना झाला आणि अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत पक्षांतर करूनही रामचंद्र आवारे नगराध्यक्षपदी विजयी झाले; मात्र पक्षाचे नगरसेवक फक्त चारच निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये ‌‘कही खुशी कही गम‌’ अशी अवस्था आहे. भाजपाचे 16 नगरसेवक निवडून एकहाती सत्ता मिळवली असतानाही नगराध्यक्षपद मात्र गेले आहे.

Bhor Nagarparishad
Industrial Pollution Complaint: जैदवाडीत कारखान्याच्या काळ्या धुरामुळे जनजीवन विस्कळीत

भोर नगरपालिकेवर मागील 17 वर्षापासून माजी आमदार संग््रााम थोपटे यांची एकहाती सत्ता आहे. या वेळी ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतली होती आणि स्वतःही निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होते. राष्ट्रवादीकडूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा घेण्यात आली. आमदार शंकर मांडेकर यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप करून राजकीय वातावरण तापले होते. त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती; मात्र रामचंद्र आवारे यांना अनुक्रमे प्रभाग क्रमांक एक 171 मते, दोन 73, सहा 6, सात 33, आठ 144, नऊ 76, दहा 98 येथे असे मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याने आवारे यांना आघाडी मिळाली; मात्र आवारे यांना स्वतःच्या प्रभाग सहामध्ये आघाडी घेता आली नाही. इतर प्रभागांनी त्यांना तारले तर संजय जगताप यांना अनुक्रमे प्रभाग क्रमांक तीन 138, चार 21, पाच 233 या प्रभागातच आघाडी मिळाली. विशेष म्हणजे संजय जगताप यांच्या प्रभाग 7 मध्ये कमी मतदान झाले. याचा फटका त्यांना बसला विशेष. भाजपच्या नगरसेकांच्या प्रभागात देखील राष्ट्रवादीच्या आवारे यांना क्रॉस वोटिंग होऊन 170 मतांनी काठावर विजय मिळवला असला तरी माजी आमदार थोपटे यांच्या नेतृत्वाखाली 16 नगरसेवक निवडून आल्याने शहरावरचे वर्चस्व त्यांनी सिद्ध केले आहे.

Bhor Nagarparishad
VSI Sugar Industry Awards: व्हीएसआय पुरस्कार जाहीर; बारामतीचा सोमेश्वर साखर कारखाना सर्वोत्कृष्ट

दरम्यान या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग््रेासचे शहराध्यक्ष संदीप शेटे व नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांचा मुलगा ऋषभ आवारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत मळेकर, बजरंग शिंदे यांचाही पराभव झाला. माजी नगरसेवक उमेश देशमुख यांच्या बंडखोरीमुळे भाजपचे सचिन मांडके यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक सातमधील भाजपच्या नगरसेविका स्नेहल तुषार घोडेकर 426 सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीपेक्षा भाजपचे नगरसेवक सर्वाधिक मतांनी विजयी झालेले आहेत. एकूणच नगरपालिकेवर भाजप, राष्ट्रवादी काँग््रेास या दोन्ही पक्षाची सत्ता आली असल्यामुळे विकास कामाच्या ठरावासाठी एकमेकांचे हात एकमेकांमध्ये राहणार असल्यामुळे भविष्यात शहराच्या विकासासाठी एकत्र यावे, ही नागरिकांची अपेक्षा आहे.

Bhor Nagarparishad
Lawyers Protection Act Draft: वकील संरक्षण कायदा मसुदा अपेक्षाभंग करणारा; वकिलांकडून तीव्र नाराजी

जगदीश किरवे यांच्या घरात सात वेळा नगरसेवक

भाजपचे नगरसेवक जगदीश किरवे यांचे भाऊ व वहिनी प्रत्येकी एकदा, पत्नी दोन वेळा आणि स्वतः तीन वेळा अशा सलग सात टर्म 35 वर्ष जगदीश किरवे यांच्या घरात नगरसेवकपद आणि दोन वेळा नगराध्यक्षपद राहिले आहे. याशिवाय जयश्री शिंदे सर्वाधिक चार वेळा नगरसेवक असून, देविदास गायकवाड व पत्नी एकदा तीन वेळा, गणेश पवार त्यांची पत्नी दोन वेळा, अमित सागळे दोन वेळा, सुमंत शेटे दोन वेळा, समीर सागळे व पत्नी दोन वेळा, गणेश मोहिते व पत्नी दोन वेळा, केदार देशपांडे व स्नेहल पवार दोन वेळा नगरसेवक झाले आहेत. नगरपालिका सभागृहात 10 माजी नगरसेवकांनी पुन्हा विजय मिळवला असून, दहा जण नव्याने निवडून आलेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news